मराठी चित्रपटसृष्टीमधील आघाडीची अभिनेत्री म्हणून अमृता खानविलकरला ओळखले जाते. तिच्या आगामी ‘कलावती’ चित्रपटाच्या शूटिंगसाठी अभिनेत्री मध्यंतरी लंडन दौऱ्यावर होती. आता भारतात परतल्यावर अमृता सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी कोकणात रत्नागिरीला गेली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : अर्जुन कपूरच्या वाढदिवसाच्या पार्टीत मलायकाच्या डान्सची चर्चा; ‘तो’ व्हायरल व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले “तुझा मुलगा…”

रत्नागिरीतील आरेवारे समुद्र किनाऱ्याजवळील सुंदर फोटो अमृताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत. मात्र, या सगळ्यात तिने शेअर केलेली इन्स्टाग्राम स्टोरी चर्चेचा विषय ठरली आहे. रत्नागिरीत जाऊन अमृता चक्क मातीची भांडी, मडकी बनवायला शिकत आहे. गार्गी कदम या अमृताच्या मैत्रिणीने तिचा हा मडकी घडवतानाचा फोटो शेअर केला होता.

हेही वाचा : “मरेपर्यंत संघर्ष आहेच” ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम पृथ्वीक प्रतापचे स्पष्ट मत; म्हणाला, “खिशात पैसे…”

अमृताने आणि गार्गीने या फोटोला सुंदर कॅप्शन देत लिहिले आहे की, “काही कळलंय आयुष्य मला, काही अजून कळायचंय, थोडं आहे परिपूर्ण, थोडं अजून घडायचंय” रत्नागिरीत गेल्यावर मातीची भांडी बनवायला शिकण्याचा काहीसा वेगळा प्रयोग अमृताने केला आहे. तिचे कौकण दौऱ्याचे फोटो पाहून नेटकरी तिचे कौतुक करीत आहेत.

हेही वाचा : “५७ व्या वर्षी चित्रपटात एवढे स्टंट कसे करतोस?” चाहत्याच्या प्रश्नाला उत्तर देत शाहरुख खान म्हणाला, “भाई मी खूप पेनकिलर…”

दरम्यान, अमृता खानविलकरच्या चंद्रमुखी आणि ऑटोग्राफ या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. आता अभिनेत्री लवकरच ‘कलावती’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अनेक नामवंत कलाकार या चित्रपटाशी जोडले गेले आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actress amruta khanvilkar goes to konkan ratnagiri and learns pottery sva 00