श्री दळवी या चिमुकल्याने जिंकले अमृताचे मन..
कलर्स मराठी वाहिनीवर सुरु झालेल्या 2 MAD – महाराष्ट्राचा अस्सल डान्सर च्या सेटवर महाराष्ट्रात असलेले भन्नाट टॅलेण्ट प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या नृत्य पद्धती थक्क करणाऱ्या आहेत. इथे आलेल्या मुला – मुलींचा डान्स पाहून या कार्यक्रमाचे परीक्षक अमृता खानविलकर, संजय जाधव आणि उमेश जाधव देखील थक्क झाले आहेत. एका पेक्षा एक अप्रतिम नृत्य सादर करून हे स्पर्धक महाराष्ट्राला आपल्यातला मॅडनेस दाखवून वेड लावायला सज्ज आहेत हे नक्की.
या मंचावर अनेक चिमुकले मुल मुली आले. आपल्या हटके डान्स स्टाईलने तर आपल्या दिलखेचक अदांनी काहींनी परीक्षकांची मने जिंकली. तर काहींनी चक्क आपल्या मनातील इच्छाच पूर्ण केल्या. परीक्षकांप्रमाणेच ते प्रेक्षकांची मने देखील नक्कीच जिंकतील यात शंका नाही. पुण्यातला श्री दळवी या फक्त १२ वर्षाच्या मुलाने अमृताला प्रोपोज केले. श्री दळवीतील निरागसता आणि नृत्यच्या परीक्षक प्रेमात पडले. डान्स ऑडीशन दरम्यान त्याने संपूर्ण डान्स अमृताकडे बघून केला आणि जेव्हा उमेश जाधव यांनी त्याला विचारले की, तू अस का केले तेव्हा त्याने अतिशय निरागस रित्या अमृताला प्रपोज केले तो म्हणाला “तू मला लय आवडते” आणि त्यावर अमृता देखील आय लव्ह यू टी म्हणाली आणि त्याच्या बरोबर डान्स देखील केला. उमेश जाधव यांनी त्याला आपल्या अंदाजात प्रतिक्रिया देखील दिल्या.
याच मंचावर मुंबईमधील तुषार खेराडे हा स्टेजवर येताच अमृताकडे बघून म्हणाला तुम्हाला बघायचं होत आणि इतकेच नव्हे तर तो अमृताला बघून खूप खुश झाला. आपण ज्या व्यक्तीला आपला आदर्श मानतो तिला भेटल्यावर अथवा तिच्यासमोर डान्स करण्याची संधी मिळाल्यावर भारावून जाणे हे सहाजिक आहे. तसेच काहीसे तुषारच देखील झाले. महाराष्ट्रातील असे भन्नाट डान्स आणि टॅलेण्ट तुम्हाला 2 MAD – महाराष्ट्राचा अस्सल डान्सर या कार्यक्रमामध्ये सोम आणि मंगळ रात्री ९.३० वाजता पाहता येतील.