मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत अभिनेत्री म्हणून अमृता खानविलकरला ओळखले जाते. अमृताने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मोठी पसंती मिळवली आहे. अभिनयासोबतच तिने तिच्या डान्सने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. अमृता ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे. ती नेहमी तिचे वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करत असते. नुकतंच अमृताने तिचे अनेक बोल्ड फोटो शेअर केले आहेत.
अमृता खानविलकरने नुकतंच एक हॉट फोटोशूट केले आहे. यात तिने काळ्या रंगाचा गाऊन परिधान केला आहे. यासोबत तिने गळ्यात चोकर घातला आहे. तसेच यासोबत हाय पोनीटेल बांधला असून यात हाय हिल्सही घातल्याचे दिसत आहे.
या ड्रेसवर अमृताने लाईट मेकअप केल्याचेही दिसत आहे. यावेळी तिने काळ्या रंगाचे आयशॅडो आणि डार्क आयलायनर लावले आहेत. त्यामुळे तिच्या या लूकला चार चांद लागले आहेत. तिच्या या हॉट फोटोवर चाहते घायाळ झाले आहेत.
खास साडी परिधान करत अंकिता लोखंडेने साजरा केला लग्नानंतरचा पहिला वाढदिवस, साडीची किंमत माहितीये का?
अमृताने या हॉट ड्रेससोबत एक रिल व्हिडीओही शेअर केला आहे. यात ती एका हिंदी गाण्यावर नाचताना दिसत आहे. तिच्या या व्हिडीओवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत. तिच्या या व्हिडीओवर एका नेटकऱ्याने ‘क्यूट डॉल’ आहेस तू, असे म्हटले आहे. तर एकाने ‘मला तुझा लूक आवडलाय’ अशी कमेंट केली आहे.
विशेष म्हणजे तिच्या या फोटोवर अनेक नेटकऱ्यांनी फायर, हार्ट, लव्ह इमोजीचा पाऊस पाडल्याचे दिसत आहे. तसेच यावर अनेकांनी ‘संतूरवाली मम्मा’, ‘गावरान तडका’, ‘ब्लॅक कॅट’ अशाही कमेंट केल्याचे दिसत आहे.