मराठी चित्रपटसृष्टीमधील आघाडीची अभिनेत्री म्हणून अमृता खानविलकरला ओळखले आहे. अमृता खानविलकर ही कायमच तिच्या चित्रपटामुळे प्रसिद्धीझोतात असते. ती सोशल मीडियावर कायमच सक्रीय असल्याचे पाहायला मिळते. मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतही अमृताने नावलौकिक मिळवला आहे. अमृताने नुकतंच एका पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली. मात्र त्यावेळी तिने परिधान केलेल्या कपड्यामुळे तिला ट्रोल करण्यात आले.
राजश्री मराठीने अमृता खानविलकरचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ फिल्मफेअर ओटीटी पुरस्कार सोहळ्यादरम्यानचा आहे. या सोहळ्याला अमृता खानविलकरने हजेरी लावली. फिल्मफेअर ओटीटी पुरस्कार सोहळ्यादरम्यान अमृता ही अतिशय ग्लॅमरस दिसत होती. यावेळी तिने लाल रंगाचा शर्ट पँट प्रकारातील एक वेस्टर्न ड्रेस परिधान केला होता. त्याबरोबर तिने गळ्यात साधी चैन आणि न्यूड मेकअपही केला होता. विशेष म्हणजे याला साजेशी हेअरस्टाईलही तिने केली होती.
आणखी वाचा : “अशा भाषेत परत बोललात तर…” शरीर दाखवण्याच्या ‘त्या’ अश्लील कमेंट करणाऱ्या नेटकऱ्यावर अमृता खानविलकर संतापली
अमृताने परिधान केलेला हा ड्रेस थोडा बोल्ड होता. यामुळे तिला नेटकऱ्यांनी ट्रोल करण्यास सुरुवात केली. “ताई तुम्ही चांगले मराठी कलावंत आहात आणि असे कपडे परिधान करणे तुम्हाला शोभत नाही”, अशी कमेंट एका नेटकऱ्याने केली आहे. तर एकाने, “काय बाई मराठी संस्कृत जपा की जरा गरीबसुद्धा अंग झाकायला मागे पुढे करत नाही आणि अतोनात पैसा आल्यावर एवढा भिकारडेपणा…”, अशी संतप्त कमेंट एका नेटकऱ्याने केली आहे.
तर एक जण म्हणाला, “दाक्षिणात्य कलाकारही त्यांची संस्कृती जपतात आणि आपल्याकडेच दुसऱ्यांची संस्कृती जपत आहेत.” “बॉलीवूड, हॉलीवूडला कॉपी करते आणि मराठी इंडस्ट्रीतले बॉलिवुडची कॉपी करतात”, असे एका नेटकऱ्याने म्हटले आहे.
आणखी वाचा : ‘अमृता खानविलकरकडून काय शिकलास?’ पती हिमांशू मल्होत्रा म्हणाला “त्याउलट कृती…”
दरम्यान काही महिन्यांपूर्वी अमृता खानविलकरचा चंद्रमुखी हा चित्रपट प्रदर्शित झाला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. या चित्रपटाने चांगली कमाई केली होती. त्यानंतर ती ‘झलक दिखला जा’या कार्यक्रमात सहभागी झाली.