बॉलिवूड कलाकारांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अभिनेता आयुष्मान खुराणा आणि ‘लायगर’ फेम अभिनेत्री अनन्या पांडे यांच्या एका व्हिडीओची सध्या चर्चा रंगली आहे. या व्हिडीओमध्ये अनन्या गाण गाताना दिसत असून आयुष्मान त्यावर थिरकताना दिसत आहे.

अभिनेता आयुष्मान खुराणाचा काल(१४ सप्टेंबर) वाढदिवस होता. त्याच्या वाढदिवसानिमित्त अनन्याने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये अनन्या ‘ये काली काली ऑंखे’ हे गाण्याचे बोल म्हणत आहे. तर आयुष्मानने यावर डान्स केला आहे. व्हिडीओच्या शेवटी अनन्याही या गाण्याच्या हूक स्टेप्स करताना दिसत आहे.

little girl lavni dance in nauvari saree on marathi song Mala Pirtichya Jhulyat Jhulwa video goes viral
“मला पिरतीच्या झुल्यात झुलवा अन् इश्काचा गुलकंद खिलवा” गाण्यावर चिमुकलीची जबरदस्त लावणी; काय ती ‘कातील अदा’ VIDEO एकदा पाहाच
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
kiliye kiliye new song
‘काय ती स्टाईल….काय तो स्वॅग…सगळंच एकदम भारी!’ चिमुकल्याचा डान्स पाहून नेटकऱ्यांना Jr. NTR आठवला…Viral Video बघाच
Viral video of a song sung by a school girl is currently going viral on social media
VIDEO: “कितीदा नव्याने तुला आठवावे…” शाळकरी विद्यार्थीनीचा आवाज ऐकून शिक्षकही झाले थक्क; सूर असा की अंगावर येतील शहारे
Tharla Tar Mag Fame Actors Dance Video
“मुझको क्या हुआ है…”, ‘ठरलं तर मग’ फेम चैतन्य अन् कुसुमचा शाहरुख खानच्या गाण्यावर जबरदस्त डान्स! कमेंट्सचा पाऊस…
zee marathi navri mile hitelarla fame leela special ukhana
Video : “एजे तिळासारखे कडू अन् मी…”, लीलाने घेतला झकास उखाणा! तर, तुळजा काय म्हणाली? एकदा ऐकाच…
Ya goshtila Navach Nahi , cinema , pune ,
चंदेरी पडदा आणि गडद काळा अंधार
Sangeet Manapmaan Movie Review in marathi
नावीन्यपूर्ण अनुभव देणारा चित्रप्रयोग

हेही पाहा >> Photos : ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ फेम अभिनेत्रीचे फोटो पाहून नेटकऱ्यांना आठवल्या ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ, कमेंट करत म्हणाले “तू तर हुबेहुब…”

आयुष्मान उत्तम अभिनेत्याबरोबरच गायकही आहे. म्हणूनच अनन्याने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये “यावर्षी तुझ्याकडील खाद्यपदार्थ शेअर कर आणि तुझी पार्श्वगायक होण्यासाठी मी दिलेली ही ऑडिशन आहे”, असं कॅप्शन दिलं आहे. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. आयुष्मानचा भन्नाट डान्स पाहून ‘पिंकविला’ने शेअर केलेल्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंटही केल्या आहेत. एका नेटकऱ्याने कमेंट करत ‘टॅलेन्ट’ अशी कमेंट केली आहे. तर दुसऱ्याने “अनन्याला स्टेप्स आठवल्या नाहीत”, असं म्हटलं आहे.

हेही वाचा >> कपूर कुटुंबियांकडून आलियाच्या डोहाळे जेवणाची जय्यत तयारी, ‘हे’ कलाकार होणार सहभागी

अनन्या पांडे सध्या इटलीमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. तिचा नुकताच प्रदर्शित झालेला ‘लायगर’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करू शकला नाही. आयुष्मान खुराणा ‘शूट द पिआनो प्लेअर’, ‘गुगली’, ‘बधाई हो २’ या चित्रपटांची मेजवाणी घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Story img Loader