शिवसेना नेत्या आणि अभिनेत्री दीपाली सय्यद या सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत त्यांच मत मांडताना दिसतात. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मागच्या काही भाषणातून ते भाजपासोबत युती करणार की काय अशी स्थिती निर्माण झाल्याची चर्चा आहे. यामुळे महाविकास आघाडीकडून राज ठाकरेंवर टिका केली जात आहे. आता यावर दीपाली यांनी एक पोस्ट शेअर केली आहे.
दीपाली सय्यद यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या ट्वीटमध्ये त्या म्हणाल्या, “तुम्हारे कार्यकर्ताओंको ये जो धरपकड्या है । उसमे आपके अमित ठाकरे को वगळ्या है । किधर छुप्या है अमित ठाकरे बतावो सबको.” यासोबत दीपाली सय्यद यांनी रााज ठाकरे, मनसे अधिकृत आणि शिवसेनेला टॅग केलं आहे.
आणखी वाचा : “मोदींना खूश करण्याकरता जीवाचं रान करणाऱ्या राज ठाकरेंनी…”, दीपाली सय्यद यांचे ट्वीट चर्चेत
आणखी वाचा : ‘ठाण्याचे बाळासाहेब ठाकरे’ अशी ओळख असणाऱ्या आनंद दिघेंबद्दलच्या या गोष्टी माहित आहे का?
दीपाली आता फक्त अभिनेत्री नाही तर सोबतच त्या राजकारणीही आहेत. विविध मुद्द्यांवर लोकांना जागरुक करण्याचेही कार्य त्या करत असतात. पुरगस्तांची मदत असो किंवा मग मुलींच्या लग्नाची जबाबदारी स्वीकारणं असो असे अनेक कार्यांत दीपाली यांनी लोकांची मदत केली आहे.