कपिलच्या शोने आता काही दिवसांसाठी ब्रेक घेतला आहे. या शोध्ये अभिनेत्री अर्चना पूरण सिंग दिसते. आता पडद्यावर तुम्हाला अर्चना ‘इंडियाज लाफ्टर चॅम्पियन’मध्ये दिसणार आहे. काही लोक तर म्हणतात की अर्चना शोमध्ये हसण्यासाठी पैसे घेते. पण लोक काय बोलतात याचे त्यांना कधीच वाईट वाटले नाही. अर्चना यांना हसताना पाहून प्रेक्षकांनाही हसू अनावर होते. पण बऱ्याचवेळा असे झाले आहे की अर्चना पूरण सिंग यांना दु: खात असतानाही हसावे लागले आहे. ही घटना अर्चना यांच्या सासूच्या मृत्यूशी संबंधित आहे, जे ऐकून तुम्हीही भावूक व्हाल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आणखी वाचा : ‘द काश्मीर फाइल्स’ची कहाणी खोटी म्हणणाऱ्या नसीरुद्दीन शाहंना, विवेक अग्निहोत्रीने दिले उत्तर

हसण्याविषयी बोलताना अर्चना म्हणाल्या, “आपल्याला नेहमी हसत रहावे लागते. पण कधी कधी आपलं हसणंही दुखावतं. जे लोकांना दिसत नाही. कधी कधी इच्छा नसतानाही हसावं लागतं. हे कलाकाराचं आयुष्य असतं. आजही तो क्षण आठवला की अश्रू अनावर होतात. हे कॉमेडी सर्कस बद्दल आहे, जेव्हा मी त्यांचे शूटिंग करत होते. त्यावेळी माझ्या सासूबाई खूप आजारी होत्या. त्यांच्या उपचारासाठी अंबानी रुग्णालयात गेले होते, पण मला शूटला जायचं होतं. मी शूटिंगला गेले आणि संध्याकाळी ६ वाजता मला कळले की त्या आता हयात नाही. मी शूटिंग करणाऱ्यांना सांगितले की माझ्या सासूबाईंचे निधन झाले असून मला लगेच जावे लागेल. त्यावर प्रोडक्शनचे लोक म्हणाले, मॅडम, १५ मिनिटांत तुमची रिअॅक्शन दिल्यानंतरच तुम्ही निघू शकता.”

आणखी वाचा : शिल्पा शेट्टीने ४७ व्या वाढदिवसानिमित्त स्वतःला भेट दिली एक लक्झरी व्हॅनिटी व्हॅन, पाहा फोटो

आणखी वाचा : अक्षयला होती सासू डिंपल कपाडियासोबत डेटवर जाण्याची इच्छा, कारण…

अर्चना पुढे म्हणाली, “त्यावेळी माझ्या सगळ्या रिअॅक्शन या हसण्याच्या होत्या. यामध्ये, मला कमी-अधिक, जोरात, हळुवार, म्हणजे प्रत्येक प्रकारे शोमध्ये हसायचे होते. हे सर्व करण्यासाठी मला १५ मिनिटे लागली. त्यावेळी समोर मी जोरात हसत होते तर दुसरीकडे आतून खूप रडत होते. तो काळ माझ्यासाठी खूप कठीण होता.”

Photos : फक्त एका इन्स्टाग्राम पोस्टमधून समांथा कमावते ‘इतके’ कोटी

या सर्व गोष्टी ऐकल्यानंतर शेखर सुमन म्हणाला, “लोक आमचं हसणं पाहतात. पण त्यामागे लपलेली आपली व्यथा त्यांना दिसत नाही आणि बघितलं तरी समजत नाही. कारण इथे कोणालाच कोणाचा विचार करायला वेळ नाही. इथे लोक एकमेकांशी काहीही शेअर करत नाहीत. माझा मुलगा आयुष वयाच्या ११ व्या वर्षी वारला. त्याच्या जाण्याने मला खूप दुःख झाले. त्यातून सावरायला मला खूप वेळ लागला. आता मी आनंद वाटून घेतो आणि लोकांमध्ये वाटण्याचे काम करतो.”

आणखी वाचा : चिमुकलीची शिवभक्ती पाहून ऊर भरून येईल! डॉ. अमोल कोल्हेंनी शेअर केला हृदयस्पर्शी व्हिडीओ

हा शो सोनी टीव्हीवर प्रसारित होईल, जो ११ जूनपासून दर शनिवारी रात्री ८.३० वाजता प्रदर्शित होणार. यामध्ये ती शेखर सुमनसोबत परिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे. रॉशेल राव या शोचे सूत्रसंचालन करणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actress archana puran singh reveals she was laughing out loud while mother in law has passed away dcp
Show comments