मागच्या काही दिवसांपासून अभिनेता सुनील शेट्टीची मुलगी अथिया शेट्टी आणि क्रिकेटर के एल राहुल यांच्या नात्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होताना दिसत आहे. लवकरच हे दोघं लग्नाच्या बेडीत अडकतील असं बोललं जात आहे. या वर्षाच्या अखेरीस या दोघांचं लग्न होणार असून यासाठी सुनील शेट्टी यांनी तयारी सुरू केल्याच्याही चर्चा होताना दिसत आहे. एवढंच नाही तर अथिया शेट्टी आणि के एल राहुल यांनी नवं घर घेतलं असून लग्नाआधी काही काळ ते दोघं लिव्ह इनमध्ये राहणार असल्याचं बोललं गेलं होतं. मात्र आता या सर्वच चर्चांना पूर्णविराम देत अथिया शेट्टीनं सत्य सांगितलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नव्या घरात बॉयफ्रेंड के एल राहुलसोबत राहण्याच्या चर्चांवर अथिया शेट्टी म्हणाली, “मी नव्या घरात बॉयफ्रेंडसोबत नाही तर माझे आई-बाबा आणि भावासोबत शिफ्ट होत आहे. माझं कुटुंब या नव्या घरात राहणार आहे.” दरम्यान अथिया शेट्टी सध्या आई-बाबा आणि भाऊ अहानसोबत दक्षिण मुंबईच्या अल्टामाउंड रोडवरील घरात राहते. काही दिवसांपूर्वीच त्यांनी रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या ‘वास्तू’ या घराच्या जवळपासच एका बिल्डिंगमध्ये घर घेतलं आहे. ज्याचं एका महिन्याचं भाडं जवळपास १० लाख रुपये आहे.

आणखी वाचा- लिएंडर पेस- किम शर्मा लवकरच अडकणार लग्नाच्या बेडीत? चर्चांना उधाण

या मुलाखतीत जेव्हा अथियाला लग्नाच्या चर्चांबद्दल विचारण्यात आलं तेव्हा ती म्हणाली, “मी यातील कोणत्याच प्रश्नाचं उत्तर देणार नाही. मी आता या प्रश्नांची उत्तर देऊन थकले आहे. जेव्हा मला असे प्रश्न विचारले जातात तेव्हा मी फक्त हसते. लोकांना जे विचार करायचे आहेत ते करू दे.” दरम्यान याआधी सुनील शेट्टी यांनी मुलीच्या लग्नासाठी हॉटेल, डिझानर बुक केल्याचं वृत्त समोर आलं होतं. मात्र आता अथियानं लग्नाच्या चर्चांवरही पूर्णविराम लावला आहे.