अभिनेत्री सुश्मिता सेनचा भाऊ राजीव सेन आणि टीव्ही अभिनेत्री चारू असोपा यांच्यातील वाद विकोपाला पोहोचले आहे. चारु असोपा आणि राजीव सेन यांनी पुन्हा एकदा वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. २०१९ मध्येते दोघेही लग्नाच्या बंधनात अडकले होते. काही महिन्यांपूर्वी त्या दोघांच्या घटस्फोटाच्या बातम्या समोर आल्या होत्या. मात्र त्यांन नात्याला आणखी एक संधी देण्याचा निर्णय घेतला होता. पण आता ते दोघेही घटस्फोट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. चारु असोपाने स्वत: याबद्दलची माहिती दिली आहे.

चारू असोपा आणि राजीव सेन हे गेल्या काही काळापासून सातत्याने चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वी त्या दोघांमधील संबंध सुधारल्याचे बोललं जात होतं. मात्र त्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो केले होते. त्यामुळे त्याच्यात पुन्हा एकदा दुरावा आल्याच्या चर्चांना उधाण आले होते. त्यानंतर आता चारुने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत राजीव सेनबरोबर घटस्फोट घेत असल्याची घोषणा केली आहे. यावेळी तिने राजीववर अनेक आरोपही केले आहे.
आणखी वाचा : “आईचा हट्ट, लग्नाची मागणी ते साखरपुडा…” ‘अशी’ सुरु झाली राणादा आणि पाठकबाईंची लव्हस्टोरी

चारु आसोपाने नुकतंच एका टाईम्स ऑफ इंडियाला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने राजीव सेनबद्दलच्या नात्याबद्दल आणि घटस्फोटावर स्पष्टपणे भाष्य केले. यावेळी चारु म्हणाली, “कोणताही माणूस जाणूनबुजून लग्न मोडण्याचा विचार करत नाही. मला माझ्या निर्णयाचा पश्चाताप करायचा नाही.”

“हे माझे दुसरे लग्न असल्याने ते वाचवण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करत होती. या प्रकरणात लोक माझी खिल्ली उडवतील याची मला कल्पना होती. लोक माझा तमाशा करत आहेत. माझा विश्वास आहे की आपण एकमेकांसाठी बनलेलो नाही. त्यामुळे आता हे लग्नही वाचणार नाही.लग्नानंतर आमच्या दोघांमध्ये सतत भांडण होत होती. प्रत्येक भांडणानंतर राजीव काही महिने किंवा काही आठवड्यांसाठी गायब व्हायचा. भांडण झाल्यावर तो माझ्याशी काहीही संपर्क ठेवायचा नाही. लॉकडाऊनच्या आधीही हे घडलं होतं. त्यावेळी तो मला तीन महिने सोडून निघून गेला होता”, असे ती म्हणाली.

आणखी वाचा : “मी राजीवला अनफॉलो केलेले नाही, उलट त्याने…” पत्नी चारु आसोपाचे सुश्मिता सेनच्या भावावर गंभीर आरोप

“सुरुवातीला मी त्याच्यात बदल घडवून आणू शकते असा विश्वास मला होता. माझी मुलगी जियाना हिच्यासाठी तरी तो यापुढे नीट वागेल, अशी मला आशा होती. पण तसं काहीही झालं नाही. मात्र सतत मारहाण करणे आणि शिवीगाळ करणे हे त्याच्या स्वभावातच आहे. त्याने मला अनेकदा शिवीगाळ केली आहे. एकदा-दोनदा तर त्याने माझ्यावर हातही उचलला आहे. मी त्याची फसवणूक करत आहे, असे त्याचे म्हणणं आहे”, असेही चारुने सांगितले.

Story img Loader