बॉलीवूड कलाकारांचं आणि खेळांचं नातं खूपच खास आहे. अनेक दिग्गज खेळाडूंवर बॉलिवूडमध्ये आतापर्यंत बायोपिक्स तयार झाले आहेत. अनेक सुप्रसिद्ध कलाकार कोणत्या ना कोणत्या खेळाचे चाहते आहेत. आपल्या आवडत्या संघाचा किंवा खेळाडूचा विजय ते अगदी उत्साहाने साजरा करत असतात. तसेच आपला आवडता खेळाडू निवृत्त झाल्यावर ते भावूनही होतात. अभिनेत्री ईशा गुप्ताही खेळाची चाहती आहे. नुकत्याच एका बातमीने तिला अश्रू अनावर झाले. रॉजर फेडररच्या निवृत्तीवर ईशा गुप्ताने भावूक होत एक व्हिडिओ शेअर केला आहे.

हेही वाचा : अजय देवगणच्या ‘थँक गॉड’ चित्रपटाविरोधात शिक्षण मंत्र्यांचे थेट अनुराग ठाकुरांना पत्र, म्हणाले…

When Devendra Fadnavis becomes Chief Minister conspiracy is hatched to create communal tension says Amar Sable
“देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतात तेव्हा जातीय तणाव निर्माण करण्याचं षड्यंत्र…”- अमर साबळे
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Marathi actress Hruta Durgule and Lalit Prabhakar new movie coming soon
“तू मला आधी का नाही भेटलास?” म्हणत हृता दुर्गुळेने ‘या’ मराठी अभिनेत्याबरोबरचा फोटो केला शेअर
Marathi actress Neelam Shirke Why did leave the acting field
एकेकाळी टॉपला असणारी नीलम शिर्के इंडस्ट्रीपासून का दूरावली? सध्या काय करते? जाणून घ्या…
najma heptulla on indira gandhi emergency
Indira Gandhi: “इंदिरा गांधींना आणीबाणीचा पश्चात्ताप होत होता”, नजमा हेपतुल्ला यांचा आत्मचरित्रात दावा; विश्वासू व्यक्तींबाबतही होती तक्रार!
Chhoti Tara Tadoba , Tadoba Chhoti Tara Tiger Calf Video, Chhoti Tara Tiger,
VIDEO : ‘तिने’ सहावेळा मातृत्त्वाचा अनुभव घेतला, पण आता…
Vasai-Virar City Municipal Corporation
प्रभारी आयुक्त रमेश मनाळे यांची समाजमाध्यमावर बदनामी
Marathi Actor Jaywant Wadkar Daughter business
जयवंत वाडकर यांच्या लेकीला पाहिलंत का? झाली नामांकित कंपनीची ब्रँड अँबॅसेडर, मराठी कलाकारांकडून कौतुकाचा वर्षाव

ईशा गुप्ता सोशल मीडियावर सक्रिय असते. नुकताच एक व्होडिओ पोस्ट करत तिने रॉजर फेडररबद्दलचे तिचे प्रेम आणि आदर व्यक्त केला. हा व्हिडिओ पोस्ट करत ईशाने “रॉजर फेडररला इतकं भावूक झालेलं मी याआधी कधीच पाहिलेलं नाही,” असे म्हणत तिने आपल्या भावना व्यक्त केल्या.

ईशा गुप्ताने लिहिले, “आम्हाला टेनिसचा इतका सुंदर खेळ दाखवल्याबद्दल तुझे खूप खूप आभार. मी लहानपणापासून तुझा खेळ बघत आले आहे. कारण मला टेनिस या खेळाइतकाच तू खेळाडू म्हणून आवडायचास आणि आजही तो आदर कायम आहे.”

आणखी वाचा : “अभिनयात ताकद नसली की…” बोल्ड फोटोंमुळे ईशा गुप्ता ट्रोल

अनेकांनी व्हिडिओवर कमेंट्स करत हार्ट इमोजी देत आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. व्हिडिओमध्ये रॉजर फेडरर भावूक होताना दिसत आहे. त्याच्या शेजारी बसलेला राफेल नदालही रडताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून ईशाप्रमाणेच रॉजर फेडररचे असंख्य चाहतेही भावून झालेले पाहायला मिळाले.

Story img Loader