बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आणि पत्नी जिनिलिया यांची जोडी प्रचंड लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. हे दोघेही कायमच चर्चेत असतात. जिनिलिया ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. ती सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ते चाहत्यांच्या संपर्कात राहतात. जिनिलियाने नुकतंच तिच्या इन्स्टाग्राम वर्षाच्या शेवटी एक मजेशीर रिल व्हिडीओ शेअर केला आहे.
जिनिलियाने सरत्या वर्षाच्या शेवटच्या दिवसाच्या निमित्ताने हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा रिल व्हिडीओ फार मजेशीर असल्याचे पाहायला मिळत आहे. या व्हिडीओला तिने हटके कॅप्शन दिले आहे. “२०२१ चे शेवटचा रिल…, कितीही कठीण प्रसंग आला तरी हसत राहा, हसत राहा. कारण तिथे नेहमी एखादी सिल्व्हर इनिंग असेल,” असे जिनिलिया म्हणाली. त्यासोबत “आशा विरुद्ध भीती आणि विश्वास विरुद्ध अविश्वास, नक्कीच रिल करा फिल करा,” असे तिने म्हटले आहे.
जिनिलियाने शेअर केलेल्या या व्हिडीओ ती फार क्यूट दिसत आहे. यात तिने म्हटले, “एक दिवस मी माझे डोकं चालवले. ते चालत चालत फार दूर गेले. आजपर्यंत परतलेले नाही…” असेही ती या व्हिडीओत सांगत आहे. यात तिचे हावभाव फारच बोलके आहेत. विशेष म्हणजे तिचा हा व्हिडीओ काही तासाच फार व्हायरल झाला आहे.
‘माझी परफेक्ट वाईफ’, रितेशने शेअर केला जिनिलियाचा हा मजेशीर व्हिडीओ
तिच्या या व्हिडीओला १ लाख ८० हजारांपेक्षा अधिक जणांनी लाईक केले आहे. तिच्या या व्हिडीओवर अनेक कमेंटही पाहायला मिळत आहे. क्यूट, सुंदर, मस्त अशा अनेक कमेंट तिच्या या व्हिडीओखाली दिसत आहे. त्यासोबत अनेक नेटकऱ्यांनी हार्ट, स्माईल इमोजीही शेअर केल्या आहेत.