गेल्या काही दिवसता अनेक हिंदी सेलिब्रिटींसोबत मराठी सेलिब्रिटीदेशील सोशल मीडियावर लस घेतानाचे फोटो किंवा व्हिडीओ शेअर करत आहेत. नुकताच अभिनेता अमेय वाघ तसचं सिद्धार्थ जाधवने करोना प्रतिबंधात्मक लसीचा पहिला डोस घेतला असून सोशल मीडियावर फोटो शेअर करत त्यांनी माहिती दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तर गेल्या काही दिवसात अनेक हिंदी सेलिब्रिटींना लसीकरणाच्या व्हिडीओमुळे ट्रोल व्हावं लागलं आहे. यात आता मराठी अभिनेत्री हीना पांचाळच्या नावाचादेखील समावेश झालाय. बिग बॉसच्या दुसऱ्या पर्वात सामिल झालेल्या हीना पांचाळने देखील करोना लसीचा पहिला डोस घेतला. लसीकरणाचा एक व्हिडीओ हीनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलाय. या व्हिडीओमुळे हीनाला माज्ञ नेटकऱ्यांनी ट्रोल केलंय.

आणखी वाचा:“या पोस्टसाठी किती पैसे मिळाले”; ट्रोल करणाऱ्या युजरला सोनम कपूरने केलं ब्लॉक

हीनाने नेहा शेअर केलेल्या व्हिडीओl ती लस घेताना चांगलीच रडकुंडीला आलेली दिसतेय. मध्येच ती तिचं मास्क खाली घेतेय. लस घेताना ती लहान मुलाप्रमाणे रडताना दिसतेय. हीनाच्या या व्हिडीओवर ती ओव्हर अ‍ॅक्टिंग करत असल्याच्या कमेंट अनेक नेटकऱ्यांनी केल्या आहेत.
एक युजर म्हणाला, ” ओव्हर अ‍ॅक्टिंगचे ५० रुपये कट” य़ावर दुसरा युजर म्हणाला ” ५० रुपये तरी कशाला , पैसेच देऊ नका” तर आणखी एक युजर म्हणालाय “फालतूचा ड्रामा”. अनेक नेटकऱ्यांनी हीनाला या व्हिडीओमुळे ट्रोल केलंय.

याआधी देखील अभिनेत्री अंकिता लोखंडे तसचं अभिनेत्री आरती सिंह यांना लसीकरणाच्या व्हिडीओमुळे नेटकऱ्यांनी ट्रोल केलं होतं.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actress heena panchal trolled after she share vaccination video on instagram user said over acting kpw