Hemangi Kavi : अभिनेत्री छाया कदम यांच्या दमदार अभिनयाची ओळख सगळ्या जगाला झाली आहे. छाया कदम यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये आपला एक ठसा उमटवला आहे. तसंच कान फेस्टिव्हलमध्येही त्यांचं कौतुक झालं. आता अभिनेत्री हेमांगी कवीने ( Hemangi Kavi ) छाया कदम यांच्याविषयी एक भावनिक पोस्ट लिहिली आहे. ज्या पोस्टची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. अभिनेत्री Hemangi Kavi ही एक संवेदनशील अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तसंच तिच्या पोस्टही चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा हेमांगीने छाया कदम यांच्यासाठी खास भावनिक पोस्ट लिहिली आहे.

काय आहे हेमांगी कवीची पोस्ट?

Cannes ला जायच्या आधीच्या आणि आता येणाऱ्या प्रत्येक achievement साठी तुझं खूप खूप कौतुक आणि अगणित शुभेच्छा. छायडे! तू तिथे जायच्या आधीही भारीच होतीस गं. मराठीतली तुझी सर्व कामं, हिंदीत ‘झुंड’, ‘अंधाधुंद’, ‘गंगूबाई काठीयावाडी’, आताचा ‘लापता लेडीज’, ‘मडगाव एक्स्प्रेस’ किती तरी सुंदर सुंदर कामं केलीस पण तुझं भारीपण आपल्या मराठी मीडियाच्या लक्षात यायला फार उशीर झाला असं मला वाटतं. त्यासाठी तुला परदेशी जाऊन यावं लागलं.अक्षरश: डोक्यावर घेतलं! ‘देर आए दुरूस्त आए’ म्हणायचं.

अनेक लोकांनी तुझं कौतुक केलं याचा आनंद-हेमांगी कवी

अनेक लोकांनीही तुझं कौतुक केलं, ते तुझ्याबद्दल आणखी आणखी वाचत होते कारण लोकांना वाचायला, तुला बघायला मज्जा येत होती. So यानिमित्ताने मला सर्व Media ला विनंती करावीशी वाटते की कुठल्या अभिनेत्रीने किती लग्नं केली, कुणाबरोबर फिरते, काय कपडे घातलेत, मूल का नाही असल्या फालतू आणि लोकांना बोअर करणाऱ्या बातम्यांपेक्षा तिच्या कामाबद्दल माहिती दिली, जमलं तर प्रसंशा केली तर बरं होईल आणि तुम्हांला social media वर उत्तम engagement ही मिळेल. जशी तुम्ही छायाच्या वेळी मिळवलीत. असो.

Hemangi Kavi Post For Actress Chhya Kadam
अभिनेत्री हेमांगी कवीची छाया कदम यांच्यासाठी खास पोस्ट, फोटोही झाले व्हायरल

कार्तिक आर्यनच्या ‘चंदू चॅम्पियन’मध्ये झळकणार मराठमोळी अभिनेत्री हेमांगी कवी; साकारणार ‘ही’ भूमिका

तू कमाल थी, है और रहेगी

एक असा काळ होता जेव्हा serial वाले तुला शूटिंग साठी स्वतः चे कपडे आणत जा सांगायचे आणि आज, जगभरातले मोठमोठे designers तुला त्यांचे कपडे देऊ करत आहेत. क्या बात है. तुझ्या अभिनयाच्या achievements सोबत या achievement चं कौतुक वाटतंय मला, कारण आपल्याला माहीतीए गं ‘स्वतःचे कपडे आणा’ सांगितल्यावर काय वाटायचं. बाकी तू कमाल थी, कमाल है और कमाल रहेगी! We Love You!

अशी पोस्ट Hemangi Kavi ने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर केली आहे. या पोस्टची चांगलीच चर्चा सोशल मीडियावर होते आहेत. तसंच हेमांगीने जे फोटो पोस्ट केले आहेत त्यावरही लाईक्सचा वर्षाव होतो आहे.

Story img Loader