अभिनेत्री आणि नृत्यांगना हेमांगी कवी धुमाळ हे नेहमीच काही ना काही कारणामुळे चर्चेत असते. हेमांगी अनेकदा सोशल मीडियावर तिचे मत बिनधास्तपणे मांडताना दिसते. ती सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. ती तिचे अनेक फोटो आणि धमाल व्हिडीओ शेअर करत चाहत्यांचं मनोरंजन करताना दिसते. नुकतंच हेमांगी कवीचा तमाशा लाईव्ह हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या निमित्ताने हेमांगी कवीने एक पोस्ट शेअर केली आहे.

हेमांगी कवी ही फेसबुकवर सक्रीय असते. नुकतंच तिने फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने ‘तमाशा लाईव्ह’ या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे काही फोटो शेअर केले आहेत. याला तिने लांबलचक कॅप्शनही दिले आहे.

CBFC suggests cuts for Kangana Ranaut’s Emergency before release
Kangana Ranaut : ‘इमर्जन्सी’ चित्रपट प्रदर्शित होण्याचा मार्ग मोकळा, कंगनाने पोस्ट करत दिली ‘ही’ माहिती
IND vs PAK Abhishek Sharma and Pakistani Bowler Fights Indian Batter Gives Death Stare After Fiery Send Off Watch Video
IND vs PAK: भारत-पाकिस्तान सामन्यात राडा, पाकिस्तानी गोलंदाजाने…
Paresh Mokashi, Prashant Damle as Hitler,
प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले हिटलरच्या भूमिकेत, परेश मोकाशी यांच्या मु. पो. बोंबिलवाडीला हिटलर सापडला
women in the theater started making strange gestures
चित्रपट सुरू असताना भर थिएटरमध्ये महिला करू लागली विचित्र हावभाव; थरारक VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “हिच्या अंगात…”
The AI dharma Story 25 October in cinemas
‘दि ए आय धर्मा स्टोरी’चे २५ ऑक्टोबरला प्रदर्शन
Phulvanti Marathi movie based on the novel
कादंबरीवर आधारित ‘फुलवंती’
The team of Manawat Murders web series at Loksatta addaa
देशाला हादरवून सोडणाऱ्या हत्यासत्राचा थरार; ‘मानवत मर्डर्स’ वेबमालिकेचा चमू ‘लोकसत्ता’ कार्यालयात
50 crore turnover of re-release films in two months
पुनःप्रदर्शित चित्रपटांची दोन महिन्यांत ५० कोटींची उलाढाल

हेमांगी कवीची इन्स्टाग्राम पोस्ट

“35 हुन अधिक भूमिका एकाच चित्रपटात साकारायला मिळणं हे एका कलाकारासाठी जितकं आव्हानात्मक तितकंच भाग्याचं! हे भाग्य मला दिलं तमाशा Live ने. मला वाटतं हा प्रकार भारतीय सिनेमा इतिहासात पहिल्यांदाच घडला आहे (मी चूक असेन तर चूक सुधारावी ) कुठल्याही कलाकारासाठी एक बायोडेटा बनू शकेल किंवा एखाद्या कलाकाराच्या करिअरमधल्या सगळ्या प्रोजेक्ट्स मधली सगळी characters मोजली तर ती ही कमी पडतील अशी वेगवेगळी characters मला या सिनेमात करायला मिळाली. बॉक्स ऑफिसवर चित्रपट चालला नाही ( जे आहे ते fact म्हणून पचवायला काहीच हरकत नसते ) पण या इतक्या कमाल चित्रपटाचा एक महत्वाचा भाग मी झाले याचा मला कायम अभिमान राहील. असं फार कमी चित्रपटांबद्दल एक कलाकार बोलतो!

यासाठी सर्वात आधी मी आमचे दिग्दर्शक संजय जाधव यांची ऋणी राहीन त्यांनी मला ‘हा’ नाही ‘हे’ रोल्स ऑफर केले. दुसरे आमचे सहाय्यक दिग्दर्शक योगेश फुलफागर यांचे आभार. ज्यांनी या सगळ्या भूमिका पार पाडण्यास मला खूप मदत केली. तिसरी आमची वेशभुषाकार सायली सोमन जिने खूप कमी वेळात आम्ही character नुसार आयत्या वेळेला वाट्टेल ती मागणी करायचो costumes accessories ची आणि ती ते उपलब्ध करून द्यायची! चौथी मी …. मेकअप आणि हेअर स्टायलिंग माझं होतं, सो मला ही थोडी शाबासकी!

बाकी चित्रपट जेव्हा ott वर येईल तेव्हा नक्की पहा अशी मी अजूनही विनंती करेन कारण एका खूप चांगल्या विषयाचा सिनेमा आहे हा. बातम्या, राजकारण, trp ची चढाओढ, त्यात होरपळून निघणारे आपण सगळे, एका मुलीची, तिच्या बापाची, घरच्यांची गोष्ट आहे जी आपण सगळ्यांनी मोठ्या पडद्यावर miss केली. छोट्या पडदयावर मात्र miss करू नका! तमाशाLive #TamashaLive”, असे हेमांगी कवीने या पोस्टमध्ये म्हटले आहे.

दरम्यान हेमांगी कवीने या चित्रपटात ३५ पेक्षा अधिक भूमिका साकारल्या आहे. या चित्रपटात तिने अनेक गाणीही गायली आहेत.

पाहा व्हिडीओ –

तमाशा लाईव्ह हा चित्रपट गेल्या १५ जुलै रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांनी फार कमी प्रतिसाद दिला होता.