३ जुलै रोजी बॉलिवूडचा मिस्टर परफेश्कनिस्ट आणि त्याची दुसरी पत्नी किरण राव यांनी घटस्फोट घेतल्याचं जाहीर केलं. आमिर आणि किरणने एक स्टेटमेंट जारी करत सहमतीने विभक्त होत असल्याचं सांगितलं आहे. आमिर-किरणच्या घटस्फोटानंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येऊ लागल्या आहेत. यात अभिनेत्री हिना खानने देखील तिचं मत मांडलंय. हिना खानने तिच्या इन्स्टा स्टोरीला एक पोस्ट शेअर करत आमिर-किरणच्या घटस्फोटावर प्रतिक्रिया दिली आहे.

हिना खानने तिच्या इन्स्टा पोस्टला आमिर खान आणि किरण रावच्या घटस्फोटाची बातमी शेअर केली होती. यात कॅप्शनमध्ये ती म्हणाली, ” तरीपण आदर….सर्वात चांगलं बनण्यासाठी वाईट परिस्थिती देखील चांगल्या प्रकारे कशी हाताळायची हे शिकायला पाहिजे. तुम्हा दोघांना शुभेच्छा” असं म्हणत हिनाने जरी तिला या बातमीने वाईट वाटलं असलं तरी दोघांच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे.

पहा फोटो: “आता फातिमासोबत शुभमंगल”, आमिर खानच्या घटस्फोटानंतर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

आमिर खान आणि किरण रावने अधिकृतरित्या एक स्टेटमेंट जारी करत विभक्त झाल्याची घोषणा केली आहे. आमिर खान आणि किरण राव १५ वर्षांपूर्वी लग्न बंधनात अडकले होते. दोघांनीही आझाद नावाचा एक मुलगा आहे. दोघांच्या घटस्फोटानंतर सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं होतं अनेकांनी आमिर खानला ट्रोल देखील केलं. दंगल गर्ल फातिमा सना शेखसोबत आमिरचं नावं पुन्हा जोडत नेटकऱ्यांनी मीम्स व्हायरल केले.

 

आणखी वाचा: पहिल्या पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर आमिर खानची झाली होती ‘अशी ‘अवस्था; तेव्हा सलमानने दिला आधार

दरम्यान फिल्म मेकर राम गोपाल वर्मा यांनी एक ट्वीट करत ट्रोलर्सची बोलसी बंद केली. “जर आमिर खान आणि किरण राव यांना घटस्फोट घेण्यात काही अडचण नाहीये, तर इतरांना अडचण का आहे? यावरून ट्रोलर्स वैयक्तिक पातळीवर ट्रोल करण्याचा मूर्खपणा करतायत. पण ती दोघं मात्र या निर्णयात वैयक्तिकरीत्या पूर्णपणे प्रोफेशनल आहेत”, अशा आशयाचं ट्वीट राम गोपल वर्मा यांनी केलं.

Story img Loader