छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका म्हणून ‘मन उडू उडू झालं’ या मालिकेकडे पाहिलं जाते. सध्या ही मालिका चांगलीच लोकप्रिय ठरताना दिसत आहे. ‘मन उडू उडू झालं’ ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. या मालिकेत इंद्रा आणि दिपूची हटके लव्हस्टोरी प्रेक्षकांना आवडत असल्याचे दिसत आहे. मात्र या मालिकेच्या प्रेक्षकांसाठी एक वाईट बातमी आहे. या मालिकेत दिपूची भूमिका साकारणारी अभिनेत्री हृता दुर्गुळे हिने या मालिकेला रामराम केला आहे. नुकतंच याबाबतची माहिती समोर आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

छोट्या पडद्यावरील ‘फुलपाखरु’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणून हृता दुर्गुळेला ओळखलं जाते. हृताने ‘फुलपाखरु’ या मालिकेतून प्रेक्षकांची मने जिंकली. ती नेहमीच काही ना काही कारणामुळे चर्चेत असते. मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक अशी तिची ओळख आहे. हृता ही सध्या ‘मन उडू उडू झालं’ मालिकेत दिपूची भूमिका साकारताना दिसत आहे. या भूमिकेमुळे हृता ही चांगलीच प्रसिद्धीझोतात आली आहे. मात्र नुकतंच हृताने ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रेक्षकांसह मालिकेच्या चाहत्यांनाही मोठा धक्का बसला आहे.

“न भूतो न भविष्यती, मराठीतील सर्वाधिक बजेटची कलाकृती…”, महेश मांजरेकरांकडून ‘महाराष्ट्र दिनी’ नव्या चित्रपटाची घोषणा

ई टाइम्सने दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी ‘मन उडू उडू झालं’ मालिकेच्या निर्मात्यांसोबत हृताचे भांडण झाले होते. या मालिकेच्या सेटवर स्वच्छता नसल्याने त्यांच्यात वाद झाल्याचे बोललं जात आहे. हा वाद सध्या विकोपाला गेला आहे. यामुळेच हृताने ही मालिका सोडण्याचा तडकाफडकी निर्णय घेतला. हृताच्या या निर्णयामुळे तिच्या चाहत्यांना जबरदस्त धक्का बसला आहे. हृताने या मालिकेत काम करण्यापूर्वी करार केला होता. त्या करारानुसार तिला एक महिन्याचा नोटीस पिरीयड पूर्ण करावा लागणार आहे. त्यानंतरच तिला ही मालिका सोडता येणार आहे.

दरम्यान हृताने अद्याप याबाबत काहीही स्पष्टीकरण दिलेले नाही. तसेच आता तिच्याजागी या मालिकेतील दिपू ही भूमिका कोण साकारणार असा प्रश्नही विचारला जात आहे. मात्र अद्याप याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

“दिघे साहेबांचे गुण दाखवण्यासाठी एक चित्रपट अपुरा, दुसऱ्या भागाची तयारी सुरु”; प्रसाद ओकने दिली माहिती

दरम्यान हृता दुर्गुळे ही सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे. हृताचे इन्स्टाग्रामवर २ मिलीयनहून अधिक फॉलोअर्स आहेत. हृता दुर्गुळे ‘दुर्वा’ या मालिकेतून सर्वांसमोर आली होती. या मालिकेनं जवळपास हजार भागांचा टप्पा पूर्ण केला होता. त्यानंतर ती ‘फुलपाखरू’ मालिकेत ती मुख्य भूमिकेत होती. या मालिकेपासून तरुणाईमध्ये तिची प्रचंड क्रेझ निर्माण झाली. काही दिवसांपूर्वी हृताचा साखरपुडा मोठ्या थाटामाटात पार पडला. त्यानंतर आता ती लवकरच प्रियकर प्रतीक शाह याच्यासोबत विवाहबंधनात अडकणार आहे. मे महिन्यात ते दोघेही लग्न करणार असल्याचे बोललं जात आहे. मात्र अद्याप याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actress hruta durgule quits man udu udu zhala tv serial due to argument with producer nrp