Timepass 3 Teaser : मराठीमध्ये प्रदर्शित होणारे उत्तम दर्जाचे चित्रपट प्रेक्षकांना भूरळ घालत आहेत. अशातच आता दिग्दर्शक रवी जाधव यांनी त्यांच्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. रवी जाधव यांचा ‘टाईमपास ३’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या पहिल्या दोन भागांना प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला. आता ‘टाईमपास ३’च्या प्रतिक्षेत प्रेक्षक आहेत. नुकताच या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियाद्वारे प्रदर्शित करण्यात आला आहे.

दिग्दर्शक रवी जाधव आणि ‘टाईमपास ३’ची मुख्य अभिनेत्री हृता दुर्गुळेने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे चित्रपटाचा टीझर शेअर केला आहे. चित्रपटाच्या या टीझरमध्ये हृताचा बिनधास्त आणि डॅशिंग अंदाज पाहायला मिळत आहे. तसेच टीझरमधील तिचे संवाद विशेष लक्षवेधी आहेत. अभिनेता प्रथमेश परबच्या देखील लूकची झलक यामध्ये पाहायला मिळत आहे. ‘टाईमपास’च्या पहिल्या दोन भागांमध्ये प्रथमेशने साकारलेली दगडूची भूमिका विशेष लोकप्रिय ठरली.

Aishwarya Narkar
Video: “शेवटचे एकदा…”, ऐश्वर्या नारकर यांनी कोणासाठी शेअर केली पोस्ट?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Tanker accident shocking video goes viral on the internet truck and bike accident know in marathi
नशीबावर विश्वास नसेल तर ‘हा’ VIDEO पाहा; टँकरला धडकला, समोर मरण दिसलं पण पुढच्याच क्षणी काय घडलं पाहा
Vasota Jungle Trek
मरणाची गर्दी! वासोटा ट्रेकला जाण्यापूर्वी हा VIDEO एकदा पाहाच
Savlyachi Janu Savli
Video: “आई मला वाचव…”, सारंगचा जीव संकटात? ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत पुढे काय होणार? वाचा…
do you know which fort is this
हा कोणता किल्ला आहे, तुम्ही ओळखू शकता का? Viral Video एकदा पाहाच
Shocking video You have never seen such a theft clothes theft caught on cctv goes viral
Shocking video: अशी चोरी तुम्ही आजपर्यंत पाहिली नसेल; अख्ख कुटुंब येतं उभं राहतं अन्…VIDEO पाहून आत्ताच सावध व्हा
Leopard attacks Viral Video
‘त्याने लढून स्वतःचा जीव वाचवला…’ घराबाहेरच्या अंगणात बिबट्याने थेट श्वानावर केला हल्ला; VIDEO पाहून उडेल थरकाप

आणखी वाचा – VIDEO : ‘धर्मवीर’ पाहण्यासाठी चित्रपटगृहामध्ये फक्त एकच माणूस, व्हिडीओ शेअर करत प्रसाद ओक म्हणाला…

चित्रपटाचा हा टीझर पाहता प्रथमेश पुन्हा एकदा प्रेक्षकांना भूरळ घालणार यात काही शंका नाही. ‘टाइमपास ३’ची कथा ही दगडू-प्राजुच्या लग्नाआधीची आहे. चित्रपटाच्या या कथेमध्ये आलेला नवा ट्विस्ट म्हणजे पालवी दिनकर पाटील. पालवीची भूमिका हृता साकारताना दिसणार आहे. तसेच चित्रपटाच्या टीझरमध्ये अभिनेते वैभव मांगले यांची झलक देखील पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा – VIDEO : “पँट घालायला विसरलीस का?”, नव्या लूकमुळे मलायका अरोरा झाली ट्रोल

पालवी हे पात्र चित्रपटाच्या टीझरमध्ये पाहायला मिळत आहे. पण चित्रपटामध्ये दगडूची प्राजु दिसणार का? याबाबत प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे. झी स्टुडिओज आणि अथांश कम्युनिकेशन्सची निर्मिती असलेल्या ‘टाइमपास ३’चे दिग्दर्शन रवी जाधव यांनी केले आहे. येत्या २९ जुलैला हा चित्रपट चित्रपटगृहामध्ये दाखल होईल.

Story img Loader