कलाक्षेत्रामधील मंडळी चर्चेत राहण्यासाठी सोशल मीडियाचा अधिकाधिक वापर करतात. पण अभिनेता असो वा अभिनेत्री एखाद्या विषयावर आपलं मत विचारपूर्वक मांडतात. ट्रोलिंगपासून लांब राहण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. पण बऱ्याचदा ही कलाकार मंडळी आपल्या वक्तव्यांमुळे सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतात. इतकंच नव्हे तर त्यांना ट्रोलिंगचाही बराच सामना करावा लागतो. असंच काहीसं अभिनेत्री जान्हवी कपूरच्या (Janhvi Kapoor) बाबतीत घडलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आणखी वाचा – रणबीर कपूरची जादू फिकी, अवाढव्य खर्च, जबरदस्त प्रमोशन करूनही ‘शमशेरा’ला थंड प्रतिसाद

जान्हवीचा एका मुलाखतीदरम्यानचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये जान्हवी गणिताबद्दल बोलताना दिसत आहे. त्यामुळे जान्हवी प्रचंड ट्रोल झाली आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर जान्हवीची नेटकऱ्यांनी खिल्ली उडवायला सुरुवात केली.

पाहा व्हिडीओ

जान्हवी म्हणते, “मी फक्त इतिहास आणि साहित्याबाबत अभ्यास केला आहे. या विषयांमध्ये मी चांगली प्रगती देखील केली. पण मला गणित हा विषय अजिबात आवडत नाही. मी आतापर्यंत बीजगणिताचा वापर केलाच नाही. मग मी त्यासाठी इतकी डोकेदुखी का केली? इतिहास आणि साहित्याचा अभ्यास तुम्हाला एक व्यक्ती म्हणून घडवण्यास मदत करतो. पण गणितामुळे तुम्ही मंदबुद्धी होता.”

आणखी वाचा – रणवीर सिंगचा न्यूड लूक पाहून नेटकरी सुसाट, मजेशीर कमेंट वाचून तुम्हालाही हसू होईल अनावर

जान्हवीच्या या वक्तव्यानंतर एका युजरने म्हटलं की, “सगळेच सुशांत सिंग राजपूत नसतात.” तर दुसऱ्या युजरने म्हटलं की, “अनन्या पांडे जान्हवी कपूरपेक्षा सुष्मिता सेन, शाहरुख खानच्या मुलाखती पाहा.” जान्हवीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actress janhvi kapoor comment on maths video goes viral on social media and star kid badly trolled watch video kmd