बॉलिवूड कलाकार हे सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. सध्या अभिनेत्री काजोल चर्चेत आहे. या चर्चा काजोलने मुंबईत नवे दोन फ्लॅट खरेदी केल्यामुळे सुरु झाल्या आहेत. काजोलने खरेदी केलेले हे अलिशान प्लॅट त्यांचा बंगला ‘शिव शक्ती’च्या जवळपास आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काजोलने जुहू येथील ‘अनन्या’ बिल्डिंगमध्ये नवे फ्लॅट खरेदी केले आहेत. हे फ्लॅट २००० क्वेअर फूट आहेत. हे फ्लॅट काजोल आणि अजयच्या सध्या राहत असलेल्या बंगल्याच्या शेजारील बिल्डिंगमध्ये आहेत. ‘स्क्वेअर फीट इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार, काजोलने खरेदी केलेले हे फ्लॅट अनन्या बिल्डिंगमध्ये १०व्या मजल्यावर आहेत. या फ्लॅटची किंमत जवळपास ११ कोटी ९५ लाख रुपये आहे.
Bappi Lahiri: ‘बिग बॉस 15’ मध्ये अखेरचे दिसले होते बप्पी लहरी, पाहा व्हिडीओ

गेल्या वर्षी काजोल आणि अजय देवगणने जुहूमध्ये आलिशान बंगला खरेदी केला होता. त्याची किंमत जवळपास ६० कोटी रुपये आहे. त्यांचा हा मुंबईतील दुसरा बंगला आहे. हा बंगला ५३१० क्वेअर फूटामध्ये आहे. हा बंगला देखील अजय आणि काजोलच्या ‘शिव शक्ती’ बंगल्या शेजारी आहे. त्यांच्या बंगल्या शेजारी अभिनेता हृतिक रोशन, अक्षय कुमार, धर्मेंद्र आणि अमिताभ बच्चन यांचा बंगला आहे. आता काजोलने जुहूमध्ये नवे फ्लॅट खरेदी केले आहेत.