कर्नाटकातील शैक्षणिक संस्थेतून सुरू झालेला हिजाबचा वाद कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. यावर देशभरातील लोक यावर प्रतिक्रिया देत आहेत. नेत्यांसोबतच बॉलिवूड सेलिब्रिटींनीही या विषयावर आपलं मत मांडलं. आता बॉलिवूडची क्वीन कंगना रणौतने तिचं मत मांडलं आहे. ज्यामुळे ती चर्चेचा विषय ठरली आहे. कंगना म्हणाली की शाळेने कोणत्याही धार्मिक चिन्हाला प्रमोट केले नाही पाहिजे.

कंगना सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकतीच कंगनाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. ही पोस्ट शेअर करत इराणमधील ‘बुर्का टू बिकिनी’ असा फोटो शेअर करत म्हणाली होती की, “तुमच्यात हिम्मत असेल तर अफगाणिस्तानमध्ये बुरखा घालून दाखवा.” तर कंगनाच्या या पोस्टवर शबाना आझमी यांनी पलटवार करत तिला प्रश्न केला होता की, “अफगाणिस्तान आणि भारतामध्ये फरक आहे हे कंगनाला माहीत नाही का?”

Uddhav Thackeray on PM Narendra Modi
“आधी मणिपूर ‘सेफ’ करा आणि मग…”; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं मोदी सरकारवर टीकास्र!
Eknath Shinde
Eknath Shinde : तुम्ही गृहखातं, विधानसभा अध्यक्षपद मागितलं…
aayushman khurana
आयुष्मान खुरानाचा ताहिराबरोबर झाला होता ब्रेकअप; ‘हे’ होते कारण, अभिनेत्याने स्वत:चं केला खुलासा
Milind Gawali
“त्या मावशींनी मला शिव्यांची लाखोली…”, ‘आई कुठे काय करते’ फेम मिलिंद गवळींनी सांगितला किस्सा
Sharad pawar on ajit pawar
Sharad Pawar : “नाद करायचा नाय….”, भरसभेत शरद पवारांचा अजित पवारांना थेट इशारा; म्हणाले, “एकदा रस्ता चुकला की…”
PM Narendra Modi on Sabarmati Report movie
पंतप्रधान नरेंद्र मोदींची ‘द साबरमती रिपोर्ट’ चित्रपटावर मोठी प्रतिक्रिया; पोस्ट करत म्हणाले, “बनावट कथानक…”
Devendra Fadnavis, Mahesh Landge,
“महेश लांडगे यांचा कुणी बालही बाका करू शकत नाही”, असं देवेंद्र फडणवीस का म्हणाले?

यावर आता कंगनाने तिची प्रतिक्रिया दिली आहे. “मुलांच्या शिक्षणासाठी हिजाबपेक्षा पुस्तक महत्त्वाची आहेत. शाळेत जय माता दीचा दुपट्टा किंवा बुरखा यापैकी काहीही घालू शकत नाही. आपल्या गणवेशाचा आदर करणे महत्त्वाचे आहे. शाळांमध्ये कोणत्याही धार्मिक चिन्हाचा किंवा वस्तूचा प्रचार करू नये”, असेही कंगना म्हणाली.

आणखी वाचा : माझ्या हत्येचा कट रचला जातोय; सारेगमप विजेती वैशाली भैसनेची फेसबुक पोस्ट; म्हणाली “आज मला…”

‘एबीपी न्यूज’ला कंगनाने नुकतीच मुलाखत दिली होती. “भारत आणि अफगाणिस्तानमध्ये फरक आहे. पण त्या (शबाना आझमी) भारत आता लोकशाही देश आहे असे सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. पण ७०-८० वर्षांपूर्वी भारतात लोकशाही नव्हती आणि मग ७० वर्षांनंतरही भारतात लोकशाही राहील याची हमी नाही. त्याचे संरक्षण करावे लागेल, आवाज उठवावा लागतो”, असे कंगना म्हणाली.

आणखी वाचा : “गळ्यात कच्चा बादाम अडकलाय का?” रानू मंडल यांचं गाणं ऐकून नेटकऱ्यांनी लावला कपाळाला हात

कंगना पुढे म्हणाली, “निवडणुक आल्यामुळे बुरखा विषयी हे सगळं नाटक सुरु आहे आणि त्याचा परिणाम होतो हे तुम्हाला माहित आहे. सध्या काश्मीरमधील एक टॉपर मुलगी आहे. त्या मुलीला जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे. तिचे जीवन नरक बनले आहे. तू बुरखा का घालत नाहीस असं म्हणतं लोक तिच्या पाठी लागले आहेत. शाळेत जाणार्‍या बहुतेक मुलांना हे सोयीचे नसते आणि ही त्यांची निवड असते. मुलींना बुरखा घातला नाही तर त्यांच्यावर बलात्कार होतो असं सांगितल्यामुळे त्यांच्या अभ्यासावर परिणाम होतं आहे. अशा गोष्टी करून तुम्ही फक्त मुस्लिम मुलींच नाही तर हिंदू मुलींचं आणि सगळ्यांचं आयुष्य उध्वस्त करत आहात.”

आणखी वाचा : ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मध्ये जेसिकाची भूमिका साकारणारी अभिनेत्री आहे तरी कोण?

कंगना म्हणाली की, पुस्तक हिजाबच्या वर आहे. शाळेचा एक कोड असतो आणि प्रत्येकाने त्याचा आदर केला पाहिजे. “मुलांचे शिक्षण अधिक महत्त्वाचे आहे. तुम्ही शाळेत गेलात की तिथे तुम्हाला गणवेश दिला जातो. गणवेश हा एक कोड असतो. शाळेत दुपट्टा घालून आलात की तुम्ही जय माता दीचा दुपट्टा घालून आलात असं म्हटलं जात नाही. शाळेचा कोड सगळ्यांसाठी सारखाच असायला हवा. शाळेत कोणत्याही धार्मिक चिन्हाचा किंवा वस्तूचा प्रचार करू नये. गणवेश दिला की गरीब-श्रीमंत, हिंदू-मुस्लिम सगळे एकत्र येतात.”