अभिनेत्री कंगना रणौतचं नशिब तिला सध्या साथ देत नाही असंच वाटतंय. तिचे अलिकडे प्रदर्शित झालेले चित्रपट बॉक्सऑफिसवर अपयशी ठरत आहेत. त्यातीलच एक चित्रपट म्हणजे ‘धाकड’. तिने या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन केलं. मात्र हा चित्रपट बॉक्सऑफिसवर चांगलाच आपटला. चित्रपटांमुळे सतत चर्चेत राहिलेल्या या अभिनेत्रीने मध्यंतरी करोडो रुपयांची कार देखील खरेदी केली. तिच्या कारचे बरेच फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले.

करोडो रुपयांची कार कंगनाने खरेदी तर केली पण तिला प्रत्यक्षात कार चालवताच येत नसल्याचं स्पष्ट झालं आहे. ‘धाकड’ चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान कर्ली टेल्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिने याबाबत सांगितलं. तुला गाडी चालवता येते का? असा प्रश्न कंगनाला विचारण्यात आला. यावेळी कंगना म्हणाली, “मला गाडी चालवताच येत नाही. त्यासाठी मी खूप प्रयत्न केला पण मला शिकता आलं नाही. ड्राइव्हिंग लायसन्सवेळी तर तीन वेळा माझा अपघात झाला.” कंगनाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आणखी वाचा – ठरलं तर! ‘रानबाजार’चे पुढील भाग ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित, प्रेक्षकांची मिळतेय पसंती

इतर सेलिब्रिटींप्रमाणेच कंगनाला देखीस महागड्या गाड्यांची आवड आहे. कंगनाने काही दिवसांपूर्वीच काळ्या रंगाची मर्सिडीज कार खरेदी केली. तिच्या या कारची किंमत जवळपास ३ कोटी रुपयांच्या घरात आहे. कंगनाने कार खरेदी करताच त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. तसेच कार खरेदी करताना तिच्या कुटुंबातील मंडळी देखील उपस्थित होती.

आणखी वाचा – Photos : १६ वर्षांची मेहनत, ३६ पैकी फक्त ५ चित्रपटच ठरले सुपरहिट, कंगना रणौतच्या करिअरला उतरती कळा?

आणखी वाचा – Photos : अजय देवगणच्या लेकीचा आजवरचा सर्वात बोल्ड लूक, इतर स्टारकिडलाही टाकलं मागे

कंगनाचा ‘धाकड’ सुपरफ्लॉप ठरला. पण तिने पुन्हा एकदा नव्या जोमाने काम करण्यास सुरुवात केली आहे. कंगना तिच्या आगामी चित्रपटांच्या तयारीला लागली आहे. ‘धाकड’मध्ये ती बरेच एक्शन सीन्स करताना दिसली. तिचा हा नवा प्रयत्न होता. पण तो पूर्णपणे फसला. आता पुन्हा एकदा बॉलिवूडची ही क्वीन उत्तम चित्रपट घेऊन बॉक्सऑफिसवर दाखल होईल अशी प्रेक्षकांना आशा आहे.

Story img Loader