बॉयकॉट ‘ब्रह्मास्त्र’ सोशल मीडियावर ट्रेंड करत असताना रणबीर कपूरने गोमांस आवडण्याबद्दल केलेल्या एका वक्तव्याचा व्हिडीओ काही दिवसांपूर्वी तुफान व्हायरल झाला होता. त्यानंतर दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींचे नावही गोमांस खाणाऱ्या कलाकारांच्या यादीमध्ये सामील केले गेले. हे दोघेही यावरून प्रचंड ट्रोल झाले. त्यापाठोपाठ अभिनेत्री कंगना रणौतचे एक जुने ट्वीट व्हायरल होत आहे. ज्यात तिला गोमांस खायला आवडत असल्याचे ती म्हणाली आहे.
आणखी वाचा : “ती सगळी आकडेवारी खोटी…” पीव्हीआरच्या सीईओंनी केला ‘ब्रह्मास्त्र’बद्दल मोठा खुलासा
घरातून बाहेर पडल्यावर तिचे आयुष्य खूप बदलले आहे हे तिने सोशल मीडिया आणि मुलाखतींमध्ये अनेकदा सांगितले आहे. या ट्वीटमध्ये कंगनाने ड्रग्ज, दारू, गोमांस या सर्वाचे सेवन केल्याची कबुली दिली होती. कंगनाने सांगितले की, तिने गोमांस खायला कशी सुरुवात केली. “ज्या दिवशी मी घर सोडत होते, तेव्हा आईने फक्त एक वचन देण्यास सांगितले होते. ती म्हणाली, आपण हिंदू आहोत कृपया गोमांस खाऊ नको. तेव्हापासून मला गोमांस खाण्याची घाई होती,” असे कंगनाने या ट्वीटमध्ये लिहिले आहे.
“गोमांसात काहीतरी असावे जे आईने खाण्यास मनाई केली आहे. म्हणून मी ते खाल्ले आणि मला ते आवडले. तेव्हापासून मी नियमितपणे गोमांस खातो. मी गोमांस खाते पण साप आणि ऑक्टोपस खाण्याचे धाडस करू शकत नाही,” असेही कंगना त्या व्हायरल झालेल्या व्हिडीओत म्हणाली होती.
हेही वाचा : “अयान मुखर्जीला हुशार म्हणणाऱ्यांना तुरुंगात पाठवले पाहिजे…” ‘ब्रम्हास्त्र’वर कंगनाची आगपाखड
२०१९ मध्ये कंगनाच्या ट्विटर अकाउंटवरून ट्विट केले गेले होते. “गोमांस आणि इतर मांस खाण्यात काहीच गैर नाही. त्याचा धर्माशी काहीही संबंध नाही, ८ वर्षांपूर्वी मी शाकाहारी झाले,” असे त्या ट्विटमध्ये लिहिले होते.