अभिनेत्री कंगना रणौत ही नेहमीच तिच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असते. सध्या ती ‘इमर्जन्सी’ या चित्रपटाच्या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. गेले अनेक महिने या चित्रपटावर ती काम करत आहे. या चित्रपटात ती इंदिरा गांधी यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. आज पोस्ट शेअर करत तिने इंदिरा गांधी यांच्याबद्दल भाष्य केलं आहे.
आणखी वाचा : सोशल मीडियावर सुरु आहे ‘ब्रह्मास्त्र’च्या मीम्सचा पाऊस, फोटो बघून तुम्हालाही अनावर होईल हसू
कंगनाने सेटवरील तिचा इंदिरा गांधी यांच्या वेशभूषेतील एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. यात तिच्या चेहऱ्यावरील हावभाव गंभीर आहेत. तर तिच्या एका बाजूला कॅमेरा आहे. हा फोटो शेअर करत एक मोठे पोस्ट तिने लिहिली. एखाद्या भूमिकेत गेल्यावर आपण स्वतःला पूर्णपणे विसरून जाण्याची भीती व्यक्त केली आहे.
कंगनाने तिचा फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले, “आज माझी ब्रेक आहे. मी याला ब्रेक नाही तर विराम म्हणेन. फावल्या वेळात स्वतःला कुठे हरवले याचा विचार केला तर आश्चर्य वाटते. आपण व्यक्तिरेखेत इतके मग्न होतो की आपल्यात काहीच उरले नाही याची जाणीव होते. तुम्ही स्वतःच्या फोटोंकडे अनोळखी व्यक्तीसारखे पाहता आणि सत्य हे आहे की तुम्ही कधीही पुर्वीसारखे असू शकत नाही.”
ती पुढे म्हणाली, “रात्रीच्या अंधारासारखी, चंद्राच्या प्रकाशासारखी, तुम्ही कधीच स्वतःपाशी राहू शकत नाही या जाणीवेसारखी, लाखो लखलखत्या सूर्यांसारखी, पर्वतांच्या उंचीसारखी तुमची भूमिका तुमच्या आत्म्यावर तिची खूण कायम ठेवते. कसेही राहिलात तरी तुमची मूळ ओळख पुसली जात नाही.”
हेही वाचा : सलमान खानबरोबर स्क्रीन शेअर? अजिबात नको…या प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रींनी नाकारले त्याचे चित्रपट
कंगना रणौत स्वतः ‘इमर्जन्सी’ या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे. या चित्रपटाबाबत चाहते खूप उत्सुक आहेत. हा एक पीरियड ड्रामा चित्रपट असेल. यामध्ये २५ जून १९७५ रोजी देशात सुरू झालेली आणीबाणीची परिस्थिती दाखवण्यात येणार आहे. लवकरच हा चित्रपट आपल्या भेटीला येईल.