बॉलिवूडमधील चर्चेतील जोडपं म्हणजे सैफ अली खान आणि करीना कपूर, दोघांच्या प्रेमकहाणीची चर्चा सगळ्यांनाच माहिती आहे. या दाम्पत्याला आज २ मुलं आहेत. यातील मोठा मुलगा तैमूर हा कायम चर्चेत असतो. आई वडिलांच्या बरोबर तो कायम असतोच मात्र तो जेहची सुद्धा काळजी घेत असतो. तैमूरला खेळाची आवड आहे. नुकताच त्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
तैमुर अली खान बॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय स्टारकिड्सपैकी एक आहे. नुकतेच खान कुटूंब स्वित्झर्लंडला गेले होते तेव्हा तैमूर अली खानने बर्फात स्किंगच आनंद लुटला होता.सध्या व्हायरल होत असणाऱ्या व्हिडीओमध्ये तो फुटबॉल खेळताना दिसत आहे. त्याच्याच वयाच्या मुलांबरोबर तो खेळत आहे.
Photos : हातात बंदूक, खाकी वर्दी; तब्बूचा ‘भोला’ चित्रपटातला लूक पाहिलात का?
तैमूरप्रमाणे जेहसुद्धा चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी त्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यात तो घराबाहेर फुटबॉल खेळताना दिसला होता. जेह उत्साहात खेळत होता मात्र त्याचा सांभाळ करणारी नॅनी मध्ये आली आणि तिने जेहच हात पकडून त्याला घरात नेले. खेळताना त्याला दुखापत होऊ नये यासाठी तिने असे केले असावे.
सैफ करीना आपल्या मुलांच्याबाबतीत खूपच जागरूक आहेत. सैफ अली खान मध्यंतरी एका मुलाखतीत म्हणाला होता, ‘जहांगीरच्या जन्मानंतर तैमूर खरंच मोठा झाला आहे. त्या दोघांमध्ये चांगले बॉण्डिंग आहे. तैमूर आपल्या धाकट्या भावाच्याबाबतीत अत्यंत संयमशील आणि संरक्षणात्मकदेखील आहे. तसेच तो म्हणाला होता की करीना आम्हा सगळ्यांची जास्त काळजी घेते.