Keerthy Suresh Antony Thattil Wedding Photos : लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेत्री कीर्ती सुरेशने लग्नगाठ बांधली आहे. कीर्तीने गोव्यात तिचा बॉयफ्रेंड अँटनी थट्टिलशी लग्न केलं. तिने तिच्या लग्नातील काही सुंदर फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. कीर्तीला या नवीन प्रवासासाठी सेलिब्रिटी व चाहते शुभेच्छा देत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

३२ वर्षीय कीर्ती लवकरच ‘बेबी जॉन’ या वरुण धवनच्या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे. पण ती तिचा पहिला बॉलीवूड चित्रपट प्रदर्शित होण्याआधी लग्नबंधनात अडकली आहे. दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या कीर्तीने वैयक्तिक आयुष्यातील नवीन इनिंगला सुरुवात केली आहे.

हेही वाचा – रीलस्टार डॅनी पंडितने केलं लग्न, त्याची ‘खऱ्या आयुष्यातील अर्धांगिनी’ पाहिलीत का?

कीर्तीने ForTheLoveOfNyke असा हॅशटॅग देत लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. कीर्ती व अँटनी यांचा लग्नसोहळा पारंपरिक दाक्षिणात्य पद्धतीने गोव्यात पार पडला. कीर्तीने तिच्या लग्नातील विविध विधींसाठी वेगवेगळे लूक केले होते.

हेही वाचा – पाच वर्षांच्या रिलेशनशिपनंतर लोकप्रिय सेलिब्रिटी जोडपं अडकलं लग्नबंधनात, फोटो आले समोर

पाहा फोटो –

 अँटनी व कीर्ती शाळेत एकत्र शिकायचे, दोघांचं लहानपणीचं प्रेम आहे. अँटनी हा बिझनेसमन असून तो दुबईत राहतो. कीर्ती व अँटनी दोघे गेल्या १५ वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते.

हेही वाचा – ‘रामायण’ सिनेमासाठी मांसाहार सोडल्याचे वृत्त पाहून भडकली साई पल्लवी; कायदेशीर कारवाईचा इशारा देत म्हणाली…

कीर्ती सुरेश ही चित्रपट निर्माते जी सुरेश कुमार आणि अभिनेत्री मेनका यांची मुलगी आहे. किर्तीने बालकलाकार म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. नंतर ‘गीतांजली’ या मल्याळम चित्रपटात मुख्य भूमिका साकारून तिने अभिनेत्री म्हणून पदार्पण केलं. आता ती तामिळ आणि तेलुगू सिनेसृष्टीतील आघाडीच्या कलाकारांपैकी एक आहे. किर्तीला दिग्गज अभिनेत्री सावित्रीच्या जीवनावर आधारित ‘महानती’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.

हेही वाचा – नातवाच्या जन्मानंतर अमिताभ बच्चन मिठाई घेऊन आले अन्…, नाना पाटेकरांनी सांगितला किस्सा; ‘ती’ भेटवस्तू अजूनही ठेवलीये जपून

कीर्ती वरुण धवनबरोबर ‘बेबी जॉन’ चित्रपटात झळकणार आहे. हा चित्रपट थलपती विजयच्या ‘थेरी’चा रिमेक आहे. ‘बेबी जॉन’ २५ डिसेंबर २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actress keerthy suresh married to boyfriend antony thattil wedding photos hrc