अभिनेत्री क्रांती रेडकर ही कायमच सोशल मीडियावर सक्रीय असते. ती नेहमी तिचे विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. क्रांती ही तिच्या मुलींबरोबर अनेक रिल शेअर करताना दिसते. नुकतंच क्रांतीने तिच्याबरोबर घडलेल्या एका घटनेबद्दल भाष्य केले आहे.
क्रांती रेडकरने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. या स्टोरीत तिने तिला बेडरुमच्या बाहेर झोपायला लागल्याबद्दलची खंत व्यक्त केली आहे. याबरोबरच तिने याबद्दल एक पोस्टही शेअर केली आहे.
आणखी वाचा : ‘चार दिन की चांदनी’ म्हणत मेघा घाडगे गौतमी पाटीलवर संतप्त, म्हणाली “तोंडातून पैसे…”
क्रांती रेडकरने शेअर केलेल्या या स्टोरीत ती बेडरुमऐवजी घरातील सोफ्यावर झोपली आहे. त्याला कॅप्शन देताना ती म्हणाली, “जेव्हा तुमची मुलं आणि नवरा हे बेडचा ताबा घेतात आणि तुम्हाला घरातील सोफ्यावर झोपावं लागतं.” क्रांतीने शेअर केलेली ही स्टोरी सध्या व्हायरल होतान दिसत आहे. तिने या स्टोरीत तिचे पती समीर वानखेडेंचाही उल्लेख केला आहे.
आणखी वाचा : “मी पत्र लिहिलंय, कारण मला फक्त…”; क्रांती रेडकरची मुख्यमंत्र्यांना भावनिक साद
दरम्यान क्रांती रेडकर ही सध्या तिच्या आगामी ‘रेनबो’ या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. तिने या चित्रपटातील अनेक बिहाईंड द सीन्सचे व्हिडीओ शेअर केले आहेत. अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ड्रग्ज प्रकरणात अटक केल्यानंतर क्रांती रेडकरचे पती समीर वानखेडेंवर लाचखोरीच्या आरोप झाले होते. यामुळे समीर वानखेडे वादाच्या भोवऱ्यात अडकले. मात्र प्रत्येक प्रसंगांना ते हिंमतीने सामोरे गेले. क्रांती देखील आपल्या पतीच्या मागे खंबीरपणे उभी राहिली. आता तर सोशल मीडियावर समीर यांच्या फॅन फॉलोईंगमध्येही वाढ झाली आहे.