काही दिवसांपूर्वी तेलुगू अभिनेत्री लक्ष्मी मंचूचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता. ज्यामध्ये ती एका व्यक्तीला पाठीत मारताना दिसली होता. त्या व्यक्तीने तिच्या मुलाखतीत अडथळा आणला होता, त्यानंतर चिडलेल्या लक्ष्मीने त्याला मारलं होतं. एका अवॉर्ड शोमध्ये घडलेल्या या घटनेबद्दल लक्ष्मीने प्रतिक्रिया दिली आहे. आपण जे केलं ते बरोबर होतं, असं तिने म्हटलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुलाखत देताना कॅमेऱ्यासमोर आलेल्या एकाला अभिनेत्रीने पाठीत घातला धपाटा, तर दुसऱ्यावर रागात ओरडली, Video Viral

दुबईमध्ये साऊथ इंडियन इंटरनॅशनल मूव्ही अवॉर्ड्स (SIIMA) 2023 च्या कार्यक्रमादरम्यान ही घटना घडली होती. तिथे लक्ष्मी मीडियाशी बोलत होती. या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये लक्ष्मी रेड कार्पेटवर मुलाखत देत होती. ती बोलत असताना एक माणूस कॅमेऱ्यासमोर आला आणि शॉट खराब झाला. यावर लक्ष्मीला राग आला आणि तिने त्याच्या पाठीत मारलं. त्यानंतर आणखी एक जण आला आणि कॅमेऱ्याच्या समोरून जाऊ लागला. त्याला लक्ष्मी “कॅमेराच्या मागे जा यार. बेसिक,” असं म्हणाली होती.

“तो माणूस उगाच व्हिडीओ काढणारा नव्हता. पण तो खूप बेफिकीर होता आणि जाणीवपूर्वक फक्त कॅमेऱ्यासमोरून फिरला. मी एक अभिनेत्री आहे, तुम्ही माझ्या कॅमेऱ्यासमोर यायचं कारण नाही. कोणत्याही कलाकाराबरोबर असं कधीही करू नका. तो ज्यास पात्र होता ते त्याला मिळालं. इतके मूलभूत मॅनर्स लोकांकडे नाहीत. मी त्याला मारलं आणि तो त्यास पात्र होता. मी मध्ये गेले नव्हते, तर तो आला होता,” असं लक्ष्मीने हिंदुस्तान टाईम्सला सांगितलं.

नाना पाटेकरांचं खरं नाव माहितीये का? रायगडमध्ये जन्मलेल्या नानांची कौटुंबीक व शैक्षणिक पार्श्वभूमी वाचून थक्क व्हाल

मुलाखतकाराने कॅमेरापर्सनला ते रेकॉर्ड न करण्यास सांगितले होते, असा उल्लेखही तिने केला. “मी तिला (मुलाखत घेणारीला) हा व्हिडीओ ठेवायला सांगितला. मी स्वतःचे रक्षण करू शकते. तो व्हिडीओ व्हायरल झाला त्याची मला पर्वा नाही. मी सुद्धा एक मुलाखतकार आहे आणि लोकांना मुलाखतीदरम्यान येऊन काही गोष्टी सांगताना पाहिले आहे. मग ते सेलिब्रिटी फोन करतात आणि या गोष्टी प्रसारित करू नका असं सांगतात. मी हे प्रत्येक सेलिब्रिटीसाठी केलं आहे. पण माझा व्हिडीओ व्हायरल झाला, त्याचा मला फरक पडत नाही,” असं लक्ष्मी म्हणाली.

लक्ष्मी मंचू ही अभिनेते मोहन बाबू आणि दिवंगत विद्या देवी यांची मुलगी आहे. तिने २०११ मध्ये आलेल्या ‘अनगनगा ओ धीरुडू’ या चित्रपटातून तेलुगू चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. तिने आतापर्यंत ‘लक्ष्मी बॉम्ब’, ‘डब्ल्यू/ओ राम’, ‘पिट्टा कथलू’, ‘मॉन्स्टर’ आणि ‘गुंटूर टॉकीज’सह अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actress lakshmi manchu says he got what he deserved on hitting man during siima 2023 hrc