इस्रायल व हमास यांच्यादरम्यान युद्ध चालू आहे. या युद्धात आतापर्यंत हजारो लोकांनी प्राण गमावले आहेत, तर हजारो नागरिक जखमी झाले आहेत. मृतांमध्ये वृद्ध, महिला व मुलांचाही समावेश आहे. इस्रायल व हमास यांच्यादरम्यान युद्धाचा आज १९ वा दिवस आहे. या युद्धाबद्दल पोस्ट करणाऱ्या अभिनेत्री मैसा अब्द इल्हादी हिला अटक करण्यात आली आहे.

इस्रायल-हमास युद्धाबाबत भारताने UNSC मध्ये स्पष्ट केली भूमिका; म्हणाले, “नागरिकांचा मृत्यू…”

उत्तर इस्रायलच्या नाझरेथ शहरात राहणाऱ्या मैसा अब्द इल्हादीला सोमवारी अटक करण्यात आली असून तिला गुरुवारपर्यंत कोठडीत ठेवण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. इस्लामिक अतिरेकी संघटना हमासने ७ ऑक्टोबर रोजी केलेल्या हल्ल्यादरम्यान गाझा पट्टी आणि इस्रायलमधील तारांचे कुंपण तोडत असलेल्या बुलडोझरचा फोटो तिने पोस्ट केला होता. या हल्ल्यात १४०० हून अधिक लोक मारले होते, असं इस्रायलचं म्हणणं होतं. तर गाझामधील हमास सरकारचे म्हणणे आहे की इस्त्रायलच्या हल्ल्यांमध्ये ५ हजारहून अधिक लोक मारले गेले आहेत. ‘इंडिया टुडे’ने याबद्दल वृत्त दिलंय.

इस्रायलचे गाझा पट्टीवरील हल्ले तीव्र; एकाच दिवसात ७०० पॅलेस्टिनी ठार, हमासचे अनेक दहशतवादी ठार झाल्याचा दावा

१९८९ पर्यंत जर्मनीची फाळणी करणाऱ्या बर्लिनची भिंत पडण्याचा संदर्भ देत मैसा अब्द इल्हादीने कॅप्शनमध्ये “लेट्स गो बर्लिन-स्टाइल,” असं लिहिलं होतं. दरम्यान, तिचे वकील जाफर फराह हे ह्युमन राइट्स असोसिएशन मौसावतचे संचालक आहेत. “तिच्यावर दहशतवादाचे समर्थन केल्याचा आरोप आहे,” असं जाफर फराह एएफपीशी बोलताना म्हणाले. दरम्यान, सध्या कोठडीत असलेल्या या ३७ वर्षीय मैसा अब्द इल्हादीने आतापर्यंत अनेक मालिका, चित्रपट आणि नाटकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.

दरम्यान, अरब इस्त्रायली गायिका दलाल अबू अमनेहला देखील या आठवड्यात तिच्या एका सोशल मीडिया पोस्टवरून ताब्यात घेण्यात आले होते.

Story img Loader