बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा ४९ वर्षांची आहे. पण आपल्या लूक आणि फिटनेसमुळे ती नव्या आणि तरुण मॉडेल तसेच अभिनेत्रींना टक्कर देताना दिसते. अर्जुन कपूरबरोबरच्या नातेसंबंधांमुळे चर्चेत राहणारी मलायका सध्या तिच्या ‘मूव्हिंग इन विथ मलायका’ या शोमुळे सर्वाधिक चर्चेत आहे. याचबरोबरीने ती आणखीन एका कारणासाठी चर्चेत येत असते ते म्हणजे तिच्या चालण्यामुळे, तिच्या चालण्यावरून अनेकदा ट्रोल केले जाते.
बॉलिवूडच्या अभिनेत्री पार्टी लुकच्याबरोबरीने जिम लूकसाठी चर्चेत येत असतात. मलायका अरोरा नुकतीच तिच्या फिटनेस सेंटरच्या बाहेर चालताना दिसली, त्यावेळी पापाराझींनी तिला थांबवून तिचे फोटो काढले आणि ती निघून गेली. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तिच्या चालण्यावरून नेटकऱ्यांनी ट्रोल करण्यास सुरवात केली आहे.
व्हिडीओमध्ये तिने काळ्या रंगाची स्पोर्ट्स ब्रा आणि घट्ट अशी लेगीत घातली आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी कमेंट्स करण्यास सुरवात केली आहे. एकाने लिहले आहे “ती खूप सुंदर दिसत आहे पण तिची लोगिन खूपच घट्ट आहे.” दुसऱ्याने लिहले आहे “ही कायमच शो ऑफ करत असते.” एकाने तर लिहले आहे “हिला चालताच येत नाही,” आणखीन एकाने लिहले आहे “ही बाई बदकसारखी का चालत आहे?” काहींनी तिची तुलना उर्फीशी केली आहे अशा शब्दात नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे.
मलायका अरोरा खान सध्या तिच्या ‘मूव्हिंग इन विथ मलायका’ शोमध्ये काही दिवसांपूर्वी मलायकाने स्टँड अप कॉमेडी करताना बहीण अमृता अरोराची खिल्ली उडवली होती. मलायकाने अमृताच्या करिअर आणि कपड्यांवरून तिला ट्रोल केलं होतं. मलायका आता बहिणीवर रुसली असली तरी त्या दोघींनी ख्रिसमसचं सेलिब्रेशन एकत्र केलं होतं. त्याचे फोटोही तिने सोशल मीडियावर शेअर केले होते.