बॉलिवूड अभिनेत्री मल्लिका शेरावत (Mallika Sherawat) तिच्या बोल्डनेसमुळे कायमच चर्चेत राहिली आहे. सध्या ती चित्रपटांपासून दूर असली तरी चाहत्यांच्या संपर्कात असते. बॉलिवूडमधील सत्य परिस्थितीबाबत देखील ती खुलेपणाने बोलताना दिसते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान मल्लिकाने हिंदी चित्रपटसृष्टीबाबत काही धक्कादायक खुलासे केले आहेत. बॉलिवूडमधील कास्टिंग काउच आणि त्यादरम्यान मल्लिकाला आलेला अनुभव तिने सांगितला.
आणखी वाचा – “माझं बाळ आता या जगातच नाही” भाचीच्या निधनानंतर अभिनेत्री दिया मिर्झा भावूक
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये मल्लिकाने सांगितलं की, ” ए लिस्टमधील सगळ्याच अभिनेत्यांनी माझ्याबरोबर काम करण्यास नकार दिला. कारण मला कोणत्याच गोष्टीमध्ये तडजोड करणं योग्य वाटत नव्हतं. जी अभिनेत्री त्यांच्या दबावामध्ये राहील त्याच अभिनेत्री या कलाकारांना आवडायच्या. पण मी तशी नाही. माझं व्यक्तिमत्त्व त्या पद्धतीचं नाही.”
पुढे बोलताना म्हणाली, “इतरांच्या इच्छेनुसार मी वागू शकत नाही. जर एखाद्या अभिनेत्याच्या चित्रपटामध्ये तुम्ही काम करत आहात आणि त्याने तुम्हाला रात्री तीन वाजता फोन करून घरी बोलावलं तर तुम्हाला जावं लागतं. पण त्याचवेळी तुम्ही त्याच्या घरी गेला नाहीत तर चित्रपटामधून तुम्हाला बाहेर काढलं जाणार हे नक्की.”
आणखी वाचा – Photos : थायलंडमध्ये पोहोचली कार्तिकी गायकवाड, समुद्रकिनाऱ्यावरील नवऱ्यासोबतचे रोमँटिक फोटो चर्चेत
मल्लिकाचं हे वक्तव्य सध्या सगळीकडेच चर्चेचा विषय ठरत आहे. तिने बॉलिवूडमधील सत्य परिस्थितीबाबत खुलेपणाने बोलणं पसंत केलं आहे. काही दिवसांपूर्वी मल्लिकाने दीपिका पदुकोणबाबतही एक वक्तव्य केलं होतं. २००४मध्ये ‘मर्डर’ चित्रपटामध्ये जे मी केलं ते दीपिका आता करत आहे असं मल्लिकाने म्हटलं होतं.