मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडी म्हणून अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर या दोघांना ओळखले जाते. ते दोघेही सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतात. आज सिद्धार्थ चांदेकरचा वाढदिवस आहे. या वाढदिवसानिमित्त त्याची पत्नी आणि अभिनेत्री मिताली मयेकर हिने एक पोस्ट शेअर केली आहे. यावेळी मितालीने पती सिद्धार्थला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

मितालीने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे. यात ते दोघेही फार आनंदात असल्याचे पाहायला मिळत आहे. यावेळी तिने फार रोमँटिक पोस्ट शेअर केली आहे.

siddharth chandekar
सिद्धार्थ चांदेकर-मिताली मयेकरचं लग्नादिवशीच झालेलं मोठं भांडण; अभिनेता किस्सा सांगत म्हणाला, “पहाटे साडेतीन वाजता …”
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
mantra of happy married life
Video : नात्यांमध्ये इगो बाजूला ठेवा, काका काकूंनी सांगितला सुखी संसाराचा मंत्र, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “ही अरेंज मॅरेजमधील सुंदरता आहे..”
Neena Gupta aunt threw her out after daughter Masaba birth
लग्न न करता झालेली आई, एकदा काकूने अचानक मध्यरात्री…; बॉलीवूड अभिनेत्रीने सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाली…
Premachi Goshta Fame Rajas Sule went on trip to new zealand with wife after wedding 19 days
लग्नाच्या १९ दिवसांनंतर ‘प्रेमाची गोष्ट’ फेम अभिनेता ‘या’ देशात गेला फिरायला, पत्नी फोटो शेअर करत म्हणाली…
bigg boss marathi season 5 fame Ankita Walawalkar meet yogita Chavan with future husband before wedding
लग्नाआधी अंकिता वालावलकर भेटली योगिता चव्हाणला; फोटो पाहून ‘डीपी दादा’ची प्रतिक्रिया, म्हणाला, “पचणार नाही…”
Abhidnya bhave Anniversary Post
“My सर्वस्व मेहुल पै…”, लग्नाच्या वाढदिवशी अभिज्ञा भावेची पतीसाठी रोमँटिक पोस्ट; मराठी कलाकारांकडून शुभेच्छांचा वर्षाव
Marathi actress Shivani sonar and ambar ganpule marry soon
शिवानी सोनार-अंबर गणपुळे लवकरच चढणार बोहल्यावर; लग्नाआधीच्या विधीला झाली सुरुवात, अभिनेत्रीने शेअर केले फोटो

मिताली मयेकरची इन्स्टाग्राम पोस्ट

“आपण त्याच्या प्रेमात का पडलो? याची प्रथम आठवण करा. जीएसटी कसा भरायचा हे त्याला माहीत होते म्हणून?की तो अप्रतिम खिचडी बनवतो म्हणून? का तो स्वयंपाकघर स्वच्छ ठेवतो म्हणून? मग तो डिनर डेट प्लॅन करतो म्हणून? किंवा मग तो स्पाची वेळ घेतो म्हणून यात चुकीच काहीच नाही..

पण मी त्याच्या प्रेमात पडले कारण त्याने मला नव्या साहसी जगाचं वचन दिलं. कारण आम्हाला एकच म्युझिक पसंत आहे किंवा आम्ही तसा प्रयत्न करतो. आम्ही विक्षिप्त होतो आणि आजही आहोत. कारण आम्ही चांगले लोक नाही. कारण तो माझा जॅक पर्सन आहे (मी खूप प्रयत्न करतेय त्याच्यासाठी योग्य रिबेका बनण्यासाठी).

कारण त्याने मला पहिल्यांदाच स्वतंत्र असल्याची जाणीव करुन दिली. मी त्याच्या नजरेत स्वतःला ओळखलं. तो माझा जिवलग मित्र आहे. आणि एखाद्या पुण्याच्या मुलासाठी मुंबईच्या मुलीला भेटणं कितीही अशक्य असलं तरी मला माझ्या जोडीदाराला भेटून एखादी ठिणगी मिळाल्यासारखं वाटलं.

तब्बल ५ वर्षे आणि पुढे…कधीकधी हे सर्व हरवल्यासारख वाटतं. सिद्धार्थ तू माझ्यासाठी अजूनही एक स्वप्नातील व्यक्ती आहेस. माझ्याशी लग्न झाल्याची वास्तविकता काहीवेळा जरा जास्तच बिघडते. मी तुझ्यासाठी उत्तम बनण्याचा प्रयत्न करेन. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा”, असे मितालीने या पोस्टमध्ये म्हटले आहे.

Video : मराठी मालिकेत वटपौर्णिमेचा उत्साह; पल्लवी, अप्पू आणि गौरीनेही घेतला उखाणा

दरम्यान सिद्धार्थ चांदेकर याची प्रमुख भूमिका असलेला झिम्मा हा चित्रपट काही महिन्यांपूर्वीच प्रदर्शित झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. या चित्रपटात सिद्धार्थसोबत सोनाली कुलकर्णी, सुचित्रा बांदेकर, सिद्धार्थ चांदेकर, निर्मिती सावंत, मृण्मयी गोडबोले, सायली संजीव, क्षिती जोग, सुहास जोशी हे प्रसिद्ध कलाकार झळकले होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन हेमंत ढोमेनं केलं होतं. त्यासोबत स्टार प्रवाहावरील “सांग तू आहेस ना ?” या मालिकेतही तो प्रमुख भूमिकेत दिसला होता.

Story img Loader