सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडी म्हणून ओळखली जाते. दोघेही सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. या मराठमोळ्या जोडप्याने गेल्यावर्षी मुंबईत घर घेतले होते. त्यांच्या नव्या घरातील गृहप्रवेशाचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. नव्या घरात गृहप्रवेश करून १ वर्ष पूर्ण झाल्याने मितालीने भावुक पोस्ट शेअर केली आहे.
गेल्यावर्षी सिद्धार्थ-मितालीने मुंबईतील नव्या घरात गृहप्रवेश केला होता, त्यापूर्वी दोघेही आरेमध्ये एका भाड्याच्या घरात राहायचे. त्यामुळे आता नव्या घराला एक वर्ष पूर्ण झाल्यावर मितालीने इन्स्टाग्रामवर खास पोस्ट शेअर केली आहे. सिद्धार्थसह गृहप्रवेशाचा फोटो पोस्ट करत मितालीने कॅप्शनमध्ये रोहित राऊतने लिहिलेली एक खास कविता शेअर केली आहे. गायक रोहित राऊत हा सिद्धार्थ-मितालीचा खूप जवळचा मित्र आहे.
हेही वाचा : दीपिका पदुकोण ‘या’ गोष्टीत आहे हुशार; छुप्या टॅलेंटबद्दल खुलासा करत म्हणाली “फक्त रणवीर आणि बहिणीसमोर…”
रोहितने कवितेची सुरुवात “वही हम हैं, वही तुम हो…” अशी केली असून “अपनेवाले घर की खिडकी को पाया हैं” या भावुक ओळीने कवितेचा शेवट केला आहे. मितालीने कॅप्शनमध्ये कविता शेअर करीत लिहिले आहे की, “धन्यवाद रोहित…तू आमच्या दोघांच्याही भावना या कवितेच्या शब्दांमधून जशास तशा मांडल्या आहेस. आज आमच्या नव्या घराला एक वर्ष पूर्ण झाले.”
मिताली मयेकरने शेअर केलेल्या पोस्टवर अनेकांनी कमेंट करीत दोघांनाही शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, सिद्धार्थ लवकरच बहुचर्चित ‘झिम्मा २’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.