‘स्वामी’ या ऐतिहासिक मालिकेतून मनोरंजन क्षेत्रात पदार्पण करत अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी आतापर्यंत विविध भूमिका सकारात प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. मराठी मनोरंजन सृष्टीत त्या सतत नावीन्यपूर्ण काम करत आल्या आहेत. अभिनयाबरोबरच लेखन आणि दिग्दर्शनातही त्यांनी आपले नशीब आजमावले आहे. आता पुन्हा एकदा त्या आपल्याला दिग्दर्शिकेच्या भूमिकेत दिसणार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा : न भूतो, न भविष्यति; मराठी सिनेसृष्टीत प्रथमच एकाच वेळी सात नव्या चित्रपटांची घोषणा

हिंदीमध्ये अनेक सुपरहिट चित्रपटांचे लेखन आणि निर्मिती करणा-या परितोष पेंटर यांच्या कॅलिडोस्कोप सिनेमा अँड पिक्चर्स प्रॉडक्शन्स आणि राजेशकुमार मोहंती यांच्या एस. आर एन्टरप्रायजर्स या दोन मोठ्या निर्मितीसंस्थांनी नुकतीच एकत्रितपणे आपल्या आगामी सात नव्या चित्रपटाची घोषणा काल केली. यातील एका चित्रपटाचे दिग्दर्शन मृणाल कुलकर्णी करणार आहेत.

या चित्रपटाचे नाव ‘फक्त महिलांसाठी’ असे आहे. या चित्रपटात सई ताम्हणकर, शिवानी रंगोळे, प्रसाद ओक आणि वंदना गुप्ते हे कलाकार महत्वपूर्ण भूमिका साकारणार आहेत. तर या चित्रपटाचे लेखन विराजस कुलकर्णी आणि ओंकार गोखले यांनी केले आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले. या पोस्टरमध्ये ट्रेनचा दरवाजा दिसत आहे. पण या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अजून जाहीर झालेली नाही.

हेही वाचा : विराजस कुलकर्णी दिग्दर्शित ‘व्हिक्टोरिया’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर, ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

मृणाल कुलकर्णी यांनी ‘प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं’ या चित्रपटातून दिग्दर्शनात पदार्पण केले. दिग्दर्शनाबरोबरच या चित्रपटाचे लेखनही त्यांनीच केले होते. त्यानंतर २०१४ साली प्रदर्शित झालेल्या ‘रमा माधव’ या माधवराव पेशवे यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा मृणाल कुलकर्णी यांनी सांभाळली. या चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला आणि आता जवळजवळ ८ वर्षांनी पुन्हा एकदा त्या दिग्दर्शिकेच्या भूमिकेत आपल्याला दिसणार आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actress mrunal kulkarni announced her new film as a director rnv