मराठमोळी मृणाल ठाकूर ही हिंदी मनोरंजन सृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. मालिकेत काम करत तिने या कलाक्षेत्रात पाऊल टाकलं. तर त्यानंतर तिने बॉलीवूड गाजवायला सुरुवात केली. आतापर्यंत तिने अनेक उत्तमोत्तम भूमिका साकारल्या. दक्षिणात्य सिनेसृष्टीत देखील तिने स्वतःची छाप पडली. आता ती एका मानाच्या पुरस्काराची मानकरी ठरली आहे.
बॉलीवूडमध्ये नाव कमवल्यानंतर २०२२ मध्ये तिचा ‘सिता रामम्’ हा तेलुगू चित्रपट प्रदर्शित झाला. यामध्ये तिने प्रमुख भूमिका साकारली. या चित्रपटात तिच्याबरोबर दक्षिणात्य सुपरस्टार दुल्कर सलमान प्रमुख भूमिकेत झळकला. या चित्रपटातील तिच्या कामाचं सर्वत्र खूप कौतुक झालं. तर आता या चित्रपटासाठी तिला एक प्रतिष्ठित पुरस्कार मिळाला आहे.
भारतीय सिनेसृष्टीत प्रतिष्ठित समजला जाणारा ‘साउथ इंडियन इंटरनॅशनल मूव्ही अवॉर्ड्स’ हा पुरस्कार सोहळा नुकताच संपन्न झाला. या पुरस्कार सोहळ्यात ‘आरआरआर’, ‘केजीएफ २’ या चित्रपटांनी बाजी मारली. तर याच पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्री मृणाल ठाकूरला ‘सिता रामम्’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट पदार्पण आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री क्रिटिक हा पुरस्कर मिळाला आहे.
हा पुरस्कार मिळाल्याबद्दल आता ती खूप खुश आहे. तरी याचबरोबर सोशल मीडियावरून देखील तिचे चाहते तिच्यावर अभिनंदनचा वर्षाव करत आहेत.