मराठमोळी मृणाल ठाकूर ही हिंदी मनोरंजन सृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. मालिकेत काम करत तिने या कलाक्षेत्रात पाऊल टाकलं. तर त्यानंतर तिने बॉलीवूड गाजवायला सुरुवात केली. आतापर्यंत तिने अनेक उत्तमोत्तम भूमिका साकारल्या. दक्षिणात्य सिनेसृष्टीत देखील तिने स्वतःची छाप पडली. आता ती एका मानाच्या पुरस्काराची मानकरी ठरली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बॉलीवूडमध्ये नाव कमवल्यानंतर २०२२ मध्ये तिचा ‘सिता रामम्’ हा तेलुगू चित्रपट प्रदर्शित झाला. यामध्ये तिने प्रमुख भूमिका साकारली. या चित्रपटात तिच्याबरोबर दक्षिणात्य सुपरस्टार दुल्कर सलमान प्रमुख भूमिकेत झळकला. या चित्रपटातील तिच्या कामाचं सर्वत्र खूप कौतुक झालं. तर आता या चित्रपटासाठी तिला एक प्रतिष्ठित पुरस्कार मिळाला आहे.

आणखी वाचा : विराट कोहलीच्या प्रेमात आकंठ बुडाली होती मृणाल ठाकूर; अनेक वर्षांनी खुलासा करत म्हणाली, “तो मला…”

भारतीय सिनेसृष्टीत प्रतिष्ठित समजला जाणारा ‘साउथ इंडियन इंटरनॅशनल मूव्ही अवॉर्ड्स’ हा पुरस्कार सोहळा नुकताच संपन्न झाला. या पुरस्कार सोहळ्यात ‘आरआरआर’, ‘केजीएफ २’ या चित्रपटांनी बाजी मारली. तर याच पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्री मृणाल ठाकूरला ‘सिता रामम्’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट पदार्पण आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री क्रिटिक हा पुरस्कर मिळाला आहे.

हेही वाचा : मराठमोळी मृणाल ठाकूर ठरली दाक्षिणात्य मनोरंजन सृष्टीतील सर्वांत महागडी अभिनेत्री! जाणून घ्या एका चित्रपटाचं मानधन

हा पुरस्कार मिळाल्याबद्दल आता ती खूप खुश आहे. तरी याचबरोबर सोशल मीडियावरून देखील तिचे चाहते तिच्यावर अभिनंदनचा वर्षाव करत आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actress mrunal thakur won best actress award in south indian international movie awards rnv