गेल्या काही दिवसांपासून नाट्यक्षेत्रामध्ये असलेला चर्चेचा विषय म्हणजे नाट्यगृहांमधील अव्यवस्थता. अभिनेते वैभव मांगले यांनी एक पोस्ट शेअर करत पुणे, औरंगाबाद, नाशिक या ठिकाणी नाटकाचे प्रयोग सुरू असताना आलेल्या अनुभवांबाबत भाष्य केलं. तर या पाठोपाठ अभिनेते भरत जाधव यांनीदेखील रत्नागिरीच्या नाट्यगृहातील अडचणींबद्दल भाष्य करत, यापुढे अशी स्थिती असेल तर रत्नागिरीत प्रयोग करणे शक्य होणार नाही, असं म्हटलं. विविध नाट्यगृहांबद्दल कलाकार तक्रारी करत असतानाच अभिनेत्री मुक्ता बर्वे व त्यांच्या ‘चारचौघी’ या नाटकाच्या टीमने लाइव्ह येत वाशीच्या विष्णुदास भावे नाट्यगृहाचं व तेथील कर्मचाऱ्यांचं कौतुक केलं.

आज ‘चारचौघी’ नाटकाचा वाशीमधील विष्णुदास भावे नाट्यगृहात प्रयोग होता. कलाकार नाट्यगृहातील दुरवस्थेबाबत अनेकदा तक्रारी करत असतात. पण ज्या नाट्यगृहाची व्यवस्था खरोखरच उत्कृष्ट आहे त्याचं कौतुक करायला हवं या हेतूने ‘चारचौघी’ या नाटकाच्या टीमने विष्णुदास भावे या नाट्यगृहाची झलक प्रेक्षकांना दाखवली. कलाकार आणि प्रेक्षक यांची कुठेही गैरसोय होणार नाही याची या नाट्यगृहाचे कर्मचारी पुरेपूर काळजी घेत असतात, असं त्यांनी सांगितलं.

lakhat ek amcha dada fame nitish chavan dance with Mahesh Jadhav and swapnil kinase
Video: प्रेमिका ने प्यार से…; ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेतील सूर्यादादाचा काजू, पुड्याबरोबर जबरदस्त डान्स, पाहा व्हिडीओ
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Girl takes off her t-shirt while dancing in university in viral video
दिल डूबा दिल डूबा गाण्यावर तरुणीचा अश्लील डान्स; स्टेजवरच टी-शर्ट काढलं अन्…VIDEO पाहून नेटकरी भडकले
Sanju Samson meets Female Fan After Match Who Injured by His Massive Six Watch Video IND vs SA
संजू सॅमसनच्या ‘त्या’ कृतीने जिंकली चाहत्यांची मनं, षटकारामुळे घायाळ झालेल्या चाहतीची घेतली भेट अन्…, पाहा VIDEO
ranbir kapoor lunch date with raha and alia
Video : लाडकी लेक कडेवर अन् अंबानींच्या नातीला पाहताच रणबीरने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया…; व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस
Thoda Tuza Ani Thoda Maza fame Sameer Paranjape propose to Shivani surve on aata hou de dhingana season 3
Video: ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’मधील तेजसने सोलापुरी भाषेत मानसीला केलं प्रपोज, म्हणाला, “बार्शी तिथं सरशी…”
Kushal Badrike
“कवीने संसारात अडकू नये…”, कुशल बद्रिकेने शेअर केला पत्नीबरोबरचा व्हिडीओ; श्रेया बुगडे कमेंट करीत म्हणाली…

आणखी वाचा : रिक्षा, टॅक्सी मिळेना मुक्ता बर्वेने केला सार्वजनिक वाहनाने प्रवास; फोटो शेअर करत म्हणाली…

मुक्ता म्हणाली, “वाशीमध्ये प्रयोग करताना खूप मजा येते. याचं कारण म्हणजे इथले प्रेक्षक चांगले आहेतच, इथे प्रयोग नेहमीच रंगतो, पण याच बरोबर या नाट्यगृहातील कर्मचाऱ्यांची नाट्यगृहाबद्दलची आस्था हेही एक कारण आहे. प्रयोगाच्या आधी साऊंड चेक करायला आले असताना मी पाहिलं की, या नाट्यगृहातील कर्मचारी व्हॅक्यूम क्लिनर घेऊन संपूर्ण नाट्यगृहाची साफसफाई करत होते.” यानंतर मुक्ता या नाटकाचे साउंड ऑपरेट करणाऱ्यांकडे गेली तेव्हा ते म्हणाले, “बालगंधर्व नाट्यगृहामध्ये स्टेजच्या समोर असलेल्या पिटात आम्ही जेव्हा नाटक सुरू असताना बसलेलो असतो तेव्हा खूप डास चावतात. डास चावू नयेत म्हणून आम्ही अक्षरशः अगरबत्ती लावून बसतो.” तर यानंतर या नाटकात महत्वपूर्ण भूमिका साकरणारा पार्थ म्हणाला, “अनेक नाट्यगृहांच्या मेकअप रूम्समध्ये स्क्रीन्स नाहीत किंवा नाट्यगृहांमधील साऊंड सिस्टिम चांगली नसल्याने स्टेजवर काय चाललंय हे आत आम्हाला पटकन लक्षात येत नाही. मेकअप रूममध्ये आवरत असताना जर एखादा क्यू आपल्याला ऐकू आला नाही तर गडबड होऊ शकते. पण वाशीच्या नाट्यगृहाच्या मेकअप रूम्समध्ये स्क्रीन्स बसवलेले आहेत, ज्यावर आपल्याला स्टेजवर काय सुरू आहे ते दिसतं, याचबरोबर ऐकूही चांगलं येतं.”

हेही वाचा : ‘चला हवा येऊ द्या’मधून भारत गणेशपुरेंचा नातू अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार, साडेचार वर्षांचा अयांश म्हणाला…

अभिनेत्री कादंबरी कदम म्हणाली, “पुण्याचं बालगंधर्व नाट्यगृह आहे, त्यांनी खरोखर विष्णुदास भावे नाट्यगृहाकडून प्रेरणा घेतली पाहिजे. बालगंधर्व नाट्यगृहामध्ये प्रयोग करताना खूप डास चावतात, अनेकदा एसी बंद असतो, मेकअप रूममधील स्वच्छतागृहं चांगली नसल्याने आम्हाला व्हीआयपी रूममध्ये जावं लागतं. पण वाशीच्या विष्णुदास भावे नाट्यगृहात ज्या प्रकारे या सर्व गोष्टींची काळजी घेतली जाते ते पाहून मला खूप आनंद वाटतोय.” रोहिणी हट्टंगडी म्हणाल्या, “इतर नाट्यगृहांची आणि विष्णुदास भावे नाट्यगृहाची परिस्थिती खूपच वेगळी आहे. इथे आल्यावर मी पाहिलं तर व्हॅक्यूम क्लिनरने सगळी स्वच्छता करणं सुरू आहे. इकडची स्वच्छतागृहं स्वच्छ असतात, मेकअप रूम्सही साफ केलेल्या असतात, इकडचा एसीही व्यवस्थित सुरू असतो. त्यामुळे तक्रारीला कुठेही जागा नाही. त्यामुळे नेहमीच इथे आल्यावर प्रसन्न वाटतं आणि प्रयोग करायलाही मजा येते.” तर इतर नाट्यगृहांच्या व्यवस्थापकांनीही विष्णुदास भावे नाट्यगृहाकडून प्रेरणा घेतली पाहिजे, असंही मुक्ता म्हणाली.