अभिनेत्री मुक्ता बर्वे ही लोकप्रिय मराठी अभिनेत्रींपैकी एक आहे. गेली अनेक वर्ष ती मनोरंजन क्षेत्रात कार्यरत आहे. नाटक, मालिका, चित्रपट असा माध्यमांमधून तिने काम केले आहे. तिच्या अभिनयनाने तिने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. मुक्ता आणि रंगभूमीचं नातं फार जुनं आहे. सध्या ती ‘चारचौघी’ या नाटकात काम करत आहे. या नाटकाच्या निमित्ताने तिने एक पोस्ट शेअर केली आहे.
मुक्ता बर्वे सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. ती स्वतःचे फोटो शेअर करत असते. तसेच आपल्या कामाबद्दलदेखील माहिती देत असते. सध्या ती ‘चारचौघी’ या नाटकात व्यस्त आहे. नुकतंच मुक्ताने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत ती रंगभूमीवरुन प्रेक्षकांचे आभार मानताना दिसत आहे. मुक्ताबरोबर ‘चारचौघी’ या नाटकाचे कलाकारही या ठिकाणी पाहायला मिळत आहे.
आणखी वाचा : “माझं प्रेम दुसऱ्याचं होताना…” हरीश दुधाडेच्या लग्नानंतर अंकित मोहनची ‘ती’ पोस्ट चर्चेत
या व्हिडीओत तिने प्रेक्षकांची व्यथाही मांडली आहे. तसेच त्यांचे आभारही मानले आहेत. “खूप प्रयत्न करुन तिकीट मिळत नाही, अशा प्रेक्षकांच्या प्रेमळ तक्रारीमुळे सोमवार दुपारी प्रयोग लावला, तो सुद्धा तुम्ही प्रेमानी फुल्ल केलात. केवळ कृतज्ञता आणि प्रेम. भेटूच पुढच्या प्रयोगाला, असे तिने या व्हिडीओत म्हटले आहे. खूप खूप आभार आणि प्रेम. भेटुच पुढच्या प्रयोगांना”, असे कॅप्शन तिने या व्हिडीओला दिले आहे.
दरम्यान प्रशांत दळवी यांनी लिहिलेल्या, काही वर्षांपूर्वी रंगभूमीवर आलेल्या त्या नाटकात वंदना गुप्ते, आसावरी जोशी, प्रतीक्षा लोणकर आणि दीपा श्रीराम लागू यांच्या मुख्य भूमिका होत्या. अत्यंत महत्त्वाच्या विषयवार भाष्य करणारं आणि स्त्रियांची मतं, त्यांचे निर्णय याबद्दल सखोल दर्शन घडवणारं हे नाटक त्याकाळी बरंच गाजलं होतं. आता हेच नाटक तब्बल एकतीस वर्षांनी एका नव्या संचात बघायला मिळत आहे. यात मुक्ता बर्वे, पर्ण पेठे, कादंबरी कदम, रोहिणी हट्टंगडी, प्रणित बोडके, पार्थ केतकर हे कलाकार झळकत आहेत.