मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून मुक्ता बर्वेला ओळखले जाते. तिने आतापर्यंत अनेक चित्रपट, नाटकातील अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. सध्या मुक्ता बर्वे ही ‘चारचौघी’ या नाटकामुळे चर्चेत आहे. नुकतंच ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते यांना झी नाट्य गौरव पुरस्कारांमध्ये जीवनगौरव प्रदान करण्यात आला. त्यांच्या आजवरच्या नाट्यसृष्टीतील कामगिरीसाठी त्यांचा गौरव करण्यात आला. यानिमित्ताने मुक्ता बर्वेने एक खास पोस्ट केली आहे.

मुक्ता बर्वेने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिने वंदना गुप्तेंबरोबरचा एक छान फोटो शेअर केला आहे. वंदना गुप्ते यांना झी नाट्य गौरव पुरस्कारांमध्ये जीवनगौरव पुरस्कार मिळाल्यानंतर तिने एक खास पोस्ट लिहिली आहे.
आणखी वाचा : “प्रेक्षकांच्या तक्रारीमुळे…” मराठमोळ्या मुक्ता बर्वेची ‘ती’ पोस्ट चर्चेत

Ya goshtila Navach Nahi , cinema , pune ,
चंदेरी पडदा आणि गडद काळा अंधार
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Paaru
“तुम्ही पारूला सून म्हणून कधी स्वीकारणार आहात?”, श्रेया बुगडेच्या प्रश्नावर अहिल्यादेवी किर्लोस्कर म्हणाल्या…
ananya pandey marriage plans
अनन्या पांडे ‘या’ व्यक्तीला करतेय डेट? अभिनेत्री लग्नाचे प्लॅन्स शेअर करत म्हणाली, “पुढील पाच वर्षांत…”
Marathi actress Aishwarya Narkar Dance With Ashwini Kasar on Ranbir Kapoor song
Video: ऐश्वर्या नारकर यांनी अश्विनी कासारबरोबर केला सुंदर डान्स, पाहा व्हिडीओ
when shakti kapoor offered help to archana puran singh buy flat
शक्ती कपूर यांनी ‘या’ अभिनेत्रीला घर घेण्यासाठी देऊ केलेली मदत; खुलासा करत म्हणाली, “त्या काळी ५० हजार रुपये…”
Parn Pethe
‘जिलबी’मध्ये पर्ण पेठे दिसणार खास भूमिकेत; चित्रपटाला होकार देण्याचे कारण सांगत म्हणाली…
Raveena Tondon And Govinda
“…तर मी तुझ्याबरोबर लग्न केले असते”, गोविंदा व रवीना टंडनबाबत सुनिता आहुजा म्हणाल्या, “मी तिला सांगितले…”

मुक्ता बर्वेची पोस्ट

“डबलसीट मधे सासू-सून म्हणुन एकत्र होतो, रूद्रम मधे आई- मुलगी म्हणुन आणि आता चारचौघी मधे तर तू साकारलेली विद्या साकारते म्हणुन. निमित्त कोणतंही चालेल एकत्र काम आणि मजा करतच राहू. वंदूताई तुला खूप खूप प्रेम, जशी आहेस तशीच मस्त,बिनधास्त,दिलखुलास रहा. तुझ्या energy नी आम्हाला inspiration देत रहा, झी नाट्य गौरव चे विशेष आभार या दोन ‘विद्या’ एकमेकांना भेटवल्या बद्दल”, अशी पोस्ट मुक्ता बर्वेने केली आहे.

आणखी वाचा : ‘मराठी सिनेसृष्टीतील तुझी क्रश कोण?’ वैभव तत्त्ववादी म्हणाला “त्या भेटल्या की…”

दरम्यान मुक्ता बर्वे आणि वंदना गुप्ते यांनी ‘डबलसीट’ या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. त्यांनी सासू- सुनेचं पात्र साकारलं होतं. तर सध्या मुक्ता ही चारचौघी या नाटकात झळकत आहे. या नाटकात ती विद्या हे पात्र साकारत आहे. याआधी हे पात्र वंदना गुप्ते यांनी साकारलं होतं. आता अनेक वर्षानंतर हे नाटक पुन्हा रंगभूमीवर आलं आहे. या नाटकाने सगळ्यांची मनं जिंकली आहेत.

Story img Loader