अभिनेत्री मुक्ता बर्वेची मनोरंजन सृष्टीतील एक चतुरस्त्र अभिनेत्री अशी ओळख आहे. नाटक, मालिका, चित्रपट अशा विविध माध्यमात तिने आपल्या अभिनयाचं नाणं खणखणीत वाजवलं आहे. तिच्या सहज सुंदर अभिनयाने ती प्रेक्षकांच्या मनात घर करण्यात यशस्वी झाली आहे. मुक्ता आणि रंगभूमीचं नातं फार जुनं आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत ती रंगभूमीवर सक्रिय होती. तिच्या तुफान गाजलेल्या ‘कोडमंत्र’ या नाटकानंतर मुक्ता आता नवीन कोणतं नाटक घेऊन येणार याची नाट्यरसिक आतुरतेने वाट बघत होते. अखेर नुकतेच मुक्ताने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत प्रेक्षकांना आनंदाची बातमी दिली आहे.

हेही वाचा : ‘दुनियादारी २’मध्ये अभिनेता अंकुश चौधरी पुन्हा साकारणार ‘दिग्या’ची भूमिका? अभिनेत्याने केला खुलासा

prasad jawade reaction on amruta deshmukh enter in maharashtrachi hasyajatra
अमृता देशमुख ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये काम करणार असल्याचं समजताच नवऱ्याला झाला आनंद, अभिनेत्री म्हणाली…
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Maharashtrachi Hasyajatra fame prasad khandekar Namrata sambherao shivali parab onkar raut new drama thet tumchya gharatun coming soon
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील कलाकारांचं नवं नाटक लवकरच रंगभूमीवर; नम्रता संभेराव, प्रसाद खांडेकरसह दिसतील ‘हे’ कलाकार
manasi moghe marathi actress announces pregnancy
मराठमोळी अभिनेत्री लवकरच होणार आई! नवरा आहे लोकप्रिय हिंदी अभिनेता, २०१३ मध्ये झालेली मिस Diva युनिव्हर्स
Actress Amrita Subhash makes her directorial debut with a play
दिग्दर्शिका…झाले मी!
actress Surabhi Hande entry in Aai Tulja Bhawani serial of colors marathi
१० वर्षांनंतर म्हाळसा आली परत! अभिनेत्री सुरभी हांडेची ‘आई तुळजाभवानी’ मालिकेत एन्ट्री
deepika padukone visited diljit dosanjh concert
Video : दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टमध्ये दीपिका पादुकोणने घेतली एन्ट्री; व्हायरल व्हिडीओमध्ये गाण्यांवर थिरकताना दिसली अभिनेत्री
sharvari jog and Abhijit amkar new serial Tu Hi Re Maza Mitwa New promo out
Video: ‘स्टार प्रवाह’च्या ‘तू ही रे माझा मितवा’ नव्या मालिकेचा नवा दमदार प्रोमो प्रदर्शित, नेटकरी म्हणाले, “कडक…”

त्यानुसार मुक्ता ‘चारचौघी’ या नाटकातून आपल्या भेटीला येणार आहे. ‘चारचौघी’ हे नाटक काही वर्षांपूर्वी रंगभूमीवर आले होते. आता ‘चारचौघी’ नावाचं नाटक एका नव्या संचात पुन्हा बघायला मिळणार आहे. हे नाटक एका नव्या ढंगात सुरु होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. मुक्ताने स्वतः याबद्दल सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. तसेच या नव्या संचात ‘चौघी’ कोण असतील असे कोडेही प्रेक्षकांना घातले आहे.

आणखी वाचा : अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर दिसणार वेगळ्या माध्यमात, साकारणार नवी भूमिका

प्रशांत दळवी यांनी लिहिलेल्या, काही वर्षांपूर्वी रंगभूमीवर आलेल्या त्या नाटकात वंदना गुप्ते, आसावरी जोशी, प्रतीक्षा लोणकर आणि दीपा श्रीराम लागू यांच्या मुख्य भूमिका होत्या. अत्यंत महत्त्वाच्या विषयवार भाष्य करणारं आणि स्त्रियांची मतं, त्यांचे निर्णय याबद्दल सखोल दर्शन घडवणारं हे नाटक त्याकाळी बरंच गाजलं होतं. आता हेच नाटक तब्बल एकतीस वर्षांनी एका नव्या संचात बघायला मिळणार आणि त्यातूनही मुक्ता बर्वेसारखी अभिनेत्री त्याचा भाग असणार हे ऐकून चाहत्यांमध्ये उत्सुकता बघायला मिळत आहे. सोशल मीडियावरून चाहते मुक्ताला शुभेच्छा देत असून नाटकाच्या शुभारंभाच्या प्रयोगाची वाट बघत आहेत.

Story img Loader