बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता त्यांच्या हटके आणि दमदार अभिनयासोबतच अनेकदा खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत आल्या आहेत. नीना यांच्या आयुष्यामध्ये त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. वयाच्या ६३व्या वर्षी देखील त्या तितक्याच मेहनतीने काम करताना दिसतात. ‘मसाबा मसाबा’ ही त्यांची नवी वेबसीरिज प्रदर्शित झाली आहे. या वेबसीरिजमध्ये त्या अभिनेते राम कपूर यांच्याबरोबर काम करताना दिसत आहेत. या वेबसीरिजनिमित्त नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये त्यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा – Video : केतकी चितळेची कलाकुसर, अटकेदरम्यान शाईफेकमुळे खराब झालेल्या ‘त्या’ ब्लाऊजवर काढलं त्रिशूळ

‘मसाबा मसाबा’ या वेबसीरिजबाबत बोलताना त्या म्हणाल्या, “२ ते ३ प्रोजेक्टवर माझं काम सुरु आहे. त्यादरम्यान मी दिग्दर्शकाला विचारलं की माझ्याबरोबर कोणता अभिनेता काम करणार आहे. यावर दिग्दर्शक म्हणाला कोणत्या अभिनेत्याने तुमच्याबरोबर काम केलं पाहिजे हे तुम्हीच आम्हाला सुचवा. पण माझ्यासाठी हे खूप कठीण काम आहे. कारण कोणताच अभिनेता माझ्याबरोबर काम करण्यास इच्छुक नाही.”

पुढे त्या म्हणाल्या, “आता अधिकाधिक अभिनेत्यांना तरुण अभिनेत्रींबरोबर काम करायचं आहे. अभिनेत्याच्या वयापेक्षा अभिनेत्री दिसायला छोटी असली तरी तरुण अभिनेत्रीच त्यांना हवी असते. आजही आपल्या समाजामध्ये बदल घडलेला मला दिसत नाही. आजही आपण पितृसत्ताक समाजामध्येच वावरत आहोत आणि नेहमी हे असंच राहणार आहे.”

आणखी वाचा – “तुम्ही प्लास्टिक सर्जरी केली आहे का?” प्रश्नावर अमृता फडणवीसांचं सडेतोड उत्तर, म्हणाल्या, “मला ट्रोल केलं पण…”

नीना यांनी चित्रपटसृष्टीबाबत आपलं मत स्पष्टपणे मांडलं आहे. नीना यांचा ‘गुडबाय’ चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. या चित्रपटामध्ये त्या बिग बी अमिताभ बच्चन यांच्याबरोबर काम करताना दिसतील. तसेच ‘ऊंचाई’ चित्रपटामध्येही त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actress neena gupta talk about movie says no male actor ready to work with her for big screen see details kmd