एकता कपूरचा आगामी रिअलिटी शो ‘लॉक अप’ हा सध्या विविध कारणांमुळे चर्चेत आहे. अभिनेत्री कंगना रणौत हा शो होस्ट करणार आहे. येत्या २७ फेब्रुवारीपासून प्रदर्शित होणाऱ्या या शो मध्ये कोणकोणते कलाकार झळकणार हे अद्याप गुलदस्त्यात आहेत. मात्र नुकतंच या रिअॅलिटी शो च्या निर्मात्यांनी याचा उलगडा करण्यास सुरुवात केली आहे. अभिनेत्री निशा रावल ही ‘लॉक अप’ या रिअॅलिटी शो ची पहिली स्पर्धक असणार आहे. नुकतंच याबाबतचा एक प्रोमो समोर आला आहे.

‘लॉक अप’ या रिअॅलिटी शो अनेक प्रोमो आतापर्यंत प्रदर्शित झाले होते. मात्र यात एकाही स्पर्धकाचा चेहरा हा स्पष्ट दिसत नव्हता. कंगनाच्या या शो चा भाग कोण असेल? यावर तर्कविर्तक सुरु होते. या शोचा भाग बनण्याची हिंमत कोण करेल? असा प्रश्नही उपस्थित होत होता. त्यानंतर आता निर्मात्यांनी एक नवा प्रोमो शेअर केला आहे. यात सुरुवातीला या स्पर्धकाचा चेहरा दिसत नाही. मात्र त्यानंतर ती स्पर्धक अभिनेत्री निशा रावल असल्याचे समोर आले. अभिनेत्री निशा रावलने या रिअॅलिटी शोमध्ये येण्याची हिंमत दाखवली आहे. निशा ही ‘लॉक अप’ची पहिली स्पर्धक असल्याची समोर आले आहे.

Tula Shikvin Changalach Dhada Fame Virisha Naik Wedding
‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ फेम अभिनेत्री अडकली लग्नबंधनात! नवरा ‘या’ लोकप्रिय मालिकेत करतोय काम, फोटो आले समोर
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
actress keerthy suresh married to boyfriend antony thattil
शुभमंगल सावधान! १५ वर्षांच्या रिलेशनशिपनंतर अभिनेत्री अडकली लग्नबंधनात, फोटो केले शेअर
reelstar danny pandit got married to neha kulkarni
रीलस्टार डॅनी पंडितने केलं लग्न, त्याची ‘खऱ्या आयुष्यातील अर्धांगिनी’ पाहिलीत का?
siddharth chandekar took special ukhana for wife mitali
“मितालीचं नाव घेतो अन् गिफ्ट करतो…”, सिद्धार्थ चांदेकरने बायकोसाठी घेतला हटके उखाणा, पाहा व्हिडीओ
Pimpri-Chinchwad:, Husband girlfriend beaten,
पिंपरी-चिंचवड: नवऱ्याच्या प्रेयसीला आणि मध्यस्थी करणाऱ्या महिलेला पत्नीने घडवली अद्दल; प्रकरण थेट पोलीस ठाण्यात
thipkyanchi rangoli fame Namrata Pradhan sister gunjan Pradhan will get marry
‘ठिपक्यांची रांगोळी’ फेम अभिनेत्रीच्या बहिणीचं ठरलं लग्न, आनंदाची बातमी देत म्हणाली…
Anurag Kashyap Daughter Haldi Ceremony
वयाच्या २३ व्या वर्षी अनुराग कश्यपची लेक अडकणार विवाहबंधनात! हळदीला सुरुवात, होणारा जावई कोण?

कोण आहे निशा रावल?

निशा रावल ही एक लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री आहे. गेल्यावर्षी म्हणजेच २०२१ मध्ये तिने पती-अभिनेता करण मेहरा यांच्यावर कौटुंबिक हिंसाचार आणि मारहाणीचा आरोप लावला होता. त्यानंतर ती प्रसिद्धीच्या झोतात आली होती. निशा रावलने करण मेहराविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर करणला अटकही झाली होती आणि काही तासांनंतर त्याची जामिनावर सुटका करण्यात आली. निशा आणि करण मेहरा यांनी एकमेकांवर गंभीर आरोप केले होते. लवकरच ते दोघेही घटस्फोट घेणार आहेत.

निशा ही कंगना रणौतच्या ‘लॉक अप’ शो मध्ये सहभागी होण्यासाठी फारच उत्साही असल्याची दिसत आहे. याबाबत निशा म्हणाली की, “हा नवीन आणि आव्हानात्मक प्रवास करण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. यापूर्वी कधीही न पाहिलेला किंवा ऐकलेला हा शो ओटीटी उद्योगात नवा बेंचमार्क सेट करेल. त्याचा एक भाग होण्यासाठी मी उत्सुक आहे. प्रेक्षकांसाठी ही एक व्हिज्युअल ट्रीट असेल. तसेच, एक अनोखा रिअॅलिटी शो सुरू केल्याबद्दल एंडेमोल, ऑल्ट बालाजी आणि एमएक्स प्लेअरचे खूप खूप अभिनंदन.”

कंगनाच्या ‘लॉक अप’ या शोमध्ये ती टीव्ही क्वीन एकता कपूरसोबत दिसणार आहे. या शोमध्ये १६ स्पर्धक हे ७२ दिवसांसाठी ‘लॉक अप’मध्ये बंद राहणार आहेत. हा शो २७ फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे

Story img Loader