अभिनेत्री नोरा फतेही आपल्या नृत्य कौश्यल्याने चाहत्यांना घायाळ करत असते. तिचे आज जगभरात चाहते आहेत. बॉलिवूडच्या अनेक गाण्यात ती थिरकताना दिसून आली आहे. नुकत्याच पार पडलेल्या फिफा विश्वचषकातदेखील तिने डान्स केला होता. सध्या तिच्या डान्सचा एक नवा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
नोरा सध्या दुबईमध्ये आपला ३१ वाढदिवस साजरा करत आहे. तिने आपल्या मित्रमंडळींबरोबर एका यॉटवर वाढदिवस साजरा केला. जिथे तिने मनापासून नृत्य केले आणि केक कापला. तिचा मित्र परिवारानेदेखील याचा आनंद घेतला. नोराने यावेळी बेली डान्स केला. फ्लोरल प्रिंटेड को-ऑर्डर सेटमध्ये अभिनेत्री सुंदर दिसत होती.
संजय दत्तवर होतं रवीना टंडनचं क्रश, खुलासा करत म्हणाली, “त्याने मला नेहमीच…”
सोशल मीडियावर तिचा व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी कमेंट्स करण्यास सुरवात केली. एकाने लिहले आहे “मुंबईत नाचायचे पैसे घेतेस दुबईत फुकट नाचतेस” तर दुसऱ्याने लिहले आहे “वाह छान डान्स करतेय” एकाने तर थेट तिला सुकेशवरून सुनावले आहे. तो असं म्हणाला, “नीट बघ मागून सुकेश जहाज घेऊन यायचा”अशा प्रतिक्रिया येत आहेत.
नोरा सोशल मीडियावरदेखील सक्रीय असते. तिच्या फोटोंवर नेटकरी कायमच पसंती दर्शवत असतात. मूळची कॅनडाची असलेल्या नोराने मुंबईत येऊन आपले स्थान तर निर्माण केलेच त्याचबरोबरीने तिने कोट्यवधी रुपयांची संपत्ती कमावली आहे.