अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस ही नेहमी विविध कारणांमुळे चर्चेत असते. सध्या ती तिच्या आगामी ‘सर्कस’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. सुकेश प्रकरणामुळे ती वादाच्या भोवऱ्यात सापडली असताना तिच्यासमोर आणखीन एक समस्या निर्माण झाली. नोरा फतेहीने तिच्यावर केस दाखल केली आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे दोघी सुकेश प्रकरणात अडकल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आपल्या नृत्याने घायाळ करणारी अभिनेत्री नोराने जॅकलिनवर मानहानीचा खटला दाखल केला आहे. रिपोर्टनुसार नोराने जॅकलीनवर २००कोटी रुपयांचा मानहानीचा खटला दाखल केला आहे. जॅकलिनच्या बरोबरीने तिने १५ माध्यम संस्थांच्या विरोधात खटला दाखल केला आहे. तिच्याविरोधात अपमानास्पद बोलले गेले आहे असा तिने दावा केला आहे. फतेहीने आरोप केला आहे की गँगस्टर सुकेश चंद्रशेखरचा समावेश असलेल्या २०० कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात तिचे नाव जबरदस्तीने वापरले गेले आहे. नोरा फतेहीने तिच्या वकिलामार्फत दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे की, “जॅकलिनने तिचे आर्थिक, सामाजिक आणि वैयक्तिक नुकसान सुनिश्चित करण्यासाठी हा कट रचला होता.” सुकेशशी तिचा थेट संपर्क नव्हता, असे अभिनेत्रीचे म्हणणे आहे. सुकेशची पत्नी लीना मारिया पॉल हिच्यामार्फत ती सुकेशला ओळखत होती. नोराने सुकेश चंद्रशेखर यांच्याकडून भेटवस्तू घेण्यास नकार दिला होता.

सुकेश चंद्रशेखर फसवणूक प्रकरणात तिची प्रतिमा खराब झाली आहे असे तिने दाव्यात म्हंटले आहे. सुकेश प्रकरणात नोरा आणि जॅकलिन या दोघींची चौकशी करण्यात आली होती. तसेच सुकेशने नोराच्या जवळच्या नातेवाईकाला ६५ लाखांची गाडी भेट दिली होती असे आरोप तिच्यावर करण्यात आले होते मात्र यावर तिने नकार दिला होता.