Actress Padmapriya : जस्टिस हेमा कमिटीच्या अहवालामुळे मल्याळम सिनेसृष्टी वादाच्या भोवऱ्यात आहे. अनेक महिला कलाकारांनी अभिनेत्यांवर आणि दिग्दर्शकांवर अत्याचाराचे, विनयभंगाचे आरोप केले आहेत. अशातच अभिनेत्री पद्मप्रिया हिने तिला आलेला वाईट अनुभव सांगितला आहे. सर्वांसमोर एका तमिळ दिग्दर्शकाने कानाखाली मारलं होतं, तो प्रसंग तिने सांगितला.

पद्मप्रियाने चित्रपटाच्या सेटवरचा एक भयानक अनुभव कथन केला. १ ऑक्टोबर रोजी केरळमधील कोझिकोड इथे एका कार्यक्रमात तिने लोकांशी बोलताना तो प्रसंग सांगितला. सर्वांसमोर मारणाऱ्या त्या दिग्दर्शकाविरोधात तिने तक्रार दिली आणि यापुढे तमिळ चित्रपट न करण्याचा निर्णय घेतला. हेमा समितीचा रिपोर्टनंतर काही आठवड्यांनी ही धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.

हेही वाचा – “त्यांच्याकडे मंगळसूत्र घ्यायलाही पैसे नव्हते”, ओम पुरी यांच्या दुसऱ्या पत्नीने सांगितला कठीण काळ; म्हणाली, “त्यांनी मला…”

पद्मप्रिया म्हणाली की त्यावेळी मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला होता की मी दिग्दर्शकाला कानाखाली मारली होती, पण तसं नव्हतं. तसेच या घटनेनंतर तिने तमिळ चित्रपटांमध्ये काम करणे बंद केले. पद्मप्रियाबरोबर या घटनेनंतर तामिळ चित्रपट निर्मात्याला सहा महिन्यांसाठी निलंबित करण्यात आले होते. मात्र, त्यानंतर पद्मप्रियाने तमिळ चित्रपट न करण्याचा निर्णय घेतला होता. तिने तिचा अनुभव जाहीररित्या सांगितला असला तरी त्या दिग्दर्शकाचं नाव मात्र घेतलं नाही. महिलांना आलेले वाईट प्रसंग त्यांनी सांगितल्यावर त्याचे भलतेच अर्थ काढले जातात किंवा त्यांनी म्हटलं ते मान्यच केलं जात नाही, असंही पद्मप्रिया म्हणाली. इंडिया टुडेने हे वृत्त दिलं आहे.

अभिनेत्री पद्मप्रिया (फोटो – इन्स्टाग्राम)

हेही वाचा – प्रसिद्ध अभिनेत्री ४३ व्या वर्षी करतेय चौथं लग्न; बॉयफ्रेंडला गुडघ्यावर बसून केलं प्रपोज, आधीचे तीन पती कोण?

स्वतःला आलेला धक्कादायक अनुभव सांगताना ‘सत्थम पोडाथे’ फेम या अभिनेत्रीने मल्याळम चित्रपटसृष्टीतील असमानतेबद्दल, खासकरून स्त्रियांना ज्या गोष्टींचा सामना करावा लागतो, त्याबद्दल भाष्य केलं. पद्मप्रियाच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास ती शेवटची दिग्दर्शिका अंजली मेननच्या ‘वंडर वुमन’मध्ये दिसली होती, हा चित्रपट सोनी लिव्ह या ओटीटी प्लॅटफॉर्मवर आला होता. या चित्रपटात नित्या मेनन, अर्चना पद्मिनी, पार्वती, अमृता सुभाष यांच्याही भूमिका होत्या. हा चित्रपट २०२२ मध्ये प्रदर्शित झाला होता.

४४ वर्षीय पद्मप्रियाने ‘शेफ’, ‘मिरुगाम’, ‘पट्टियल’, ‘पोकिस्थम’ या चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका साकारल्या आहेत.