मराठीमधील सुप्रसिद्ध अभिनेत्रींच्या यादीमध्ये पूजा सावंतचं नाव आवर्जून घेतलं जातं. पूजा सध्या रुपेरी पडद्यापासून दूर आहे. पण सोशल मीडियाच्या माध्यमातून ती नेहमीच चाहत्यांशी संपर्क साधते. सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या पूजाने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. पूजाने नवीन घर खरेदी केलं आहे. पूजाने तिच्या नवीन घरी मित्र-मंडळींसाठी खास पार्टीचं आयोजन केलं होतं. यादरम्यानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पूजाने नवीन घर घेतलं असल्याचं तिच्या जवळच्या मित्राने व्हिडीओ शेअर करत सांगितलं आहे.

आणखी वाचा – VIDEO : एकाच वेळी १०८ सुर्यनमस्कार, तरीही प्राजक्ता माळी दमली नाही, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

पूजाचा जवळचा मित्र आणि अभिनेता भूषण प्रधानने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन पूजाच्या घरातील एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये पूजासह अभिनेता गश्मिर महाजनी आणि इतर काही मित्र-मंडळी मजा-मस्ती करताना दिसत आहेत. भूषणने हा व्हिडीओ शेअर करताना म्हटलं की, “नवीन घरासाठी पूजा तुझं खूप अभिनंदन. आनंद, प्रेम आणि हास्याने तुझं नवीन घर भरलेलं असावं. खूप साऱ्या शुभेच्छा.”

भूषणने हा व्हिडीओ शेअर करताच सोशल मीडियाच्या माध्यमातून पूजाला तिच्या चाहत्यांनी नवीन घरासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. भूषणने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये पूजाच्या घराची झलक पाहायला मिळत आहे. तसेच पूजा या व्हिडीओमध्ये फारच सुंदर दिसत आहे. पूजाने कलाक्षेत्रात स्वतःच्या मेहनतीवर नाव कमावत आज स्वतःचं घर घेतलं आहे.

आणखी वाचा – VIDEO : पाकिस्तानी रेस्तराँने काय केलं पाहा? आलियाच्या ‘गंगूबाई’चा व्हिडीओ शेअर करत पुरुषांसाठी ठेवली ऑफर

पूजाने ‘क्षणभर विश्रांती’ चित्रपटामधून चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर तिने ‘दगळी चाळ’, ‘भेटली तू पुन्हा’, ‘लपाछपी’ सारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. ‘महाराष्ट्राचा बेस्ट डान्सर’ या रिएलिटी शोच्या परीक्षक पदाची धूरा देखील पूजाने सांभाळली. पूजाने उत्तमोत्तम भूमिका रुपेरी पडद्यावर साकारत प्रेक्षकांचं भरभरुन मनोरंजन केलं.

Story img Loader