गेल्या काही दिवसांपासून मराठी सिनेसृष्टीत ‘रानबाजार’ या वेबसिरीजची चांगलीच चर्चा पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच या वेबसीरिजचा टीझर प्रदर्शित झाला. सत्य घटनांच्या संदर्भांवर आधारित या वेबसीरिजमध्ये आजवर कधीही न पाहिलेली गोष्ट पाहायला मिळणार आहे. या वेबसीरिजमध्ये प्रमुख भूमिकेत असलेल्या अभिनेत्री प्राजक्ता माळी आणि तेजस्विनी पंडित पाहायला मिळत आहे.

रानबाजार या वेबसीरिज यात प्राजक्ताचा खूप बोल्ड अवतार पाहायला मिळत आहे. यावरुन प्राजक्ताला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. अनेकांनी यावरुन तिच्यावर टीका केली आहे. तिच्या या वेबसीरिजमधील बोल्ड दृश्यांमुळे तिला ट्रोल केले जात आहे. मात्र नुकतंच प्राजक्ताने यावर भाष्य केले आहे.

Long term investment in mutual fund
फंड जिज्ञासा : म्युच्युअल फंडातील दीर्घ काळ गुंतवणूक निश्चितच फायद्याची!
Manoj Jarange, Manoj Jarange movement,
विश्लेषण : मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा प्रभाव ओसरला?…
Maslow s pyramid loksatta
Money Mantra जोखमीची गुंतवणूक कोणती?
anil kapoor
अभिनेत्रीचा ‘सलाम-ए-इश्क’ चित्रपटातील अनिल कपूर यांच्याबरोबरच्या किसिंग सीनबाबत खुलासा; म्हणाली, “मला रडावे…”
PM Narendra Modi Speech
Narendra Modi : आणीबाणी ते कलाकारांवर बंदी! नरेंद्र मोदींनी ‘हे’ पाच मुद्दे उपस्थित करत काँग्रेसला करुन दिली संविधानाची आठवण
dr arun datar Surya namaskar loksatta
आठवड्याची मुलाखत : ‘सूर्यनमस्कार हे व्रतासारखे; त्यात सातत्य महत्त्वाचे’
Maharashtrachi Hasyajatra fame shivali parab shares bts video of mangala movie
Video: शिवाली परबने ‘मंगला’ चित्रपटातील ‘तो’ सीन केल्यानंतर दिग्दर्शिकेने जोडलेले हात, अभिनेत्री अनुभव सांगत म्हणाली, “एका श्वासात…”
transgender marathi actor Pranit Hatte got married
तृतीयपंथी मराठी अभिनेत्री अडकली विवाहबंधनात, लग्नाचे फोटो शेअर करत म्हणाली, “गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने…”

“पश्या मला तुला कडकडून मिठी मारायची आहे…”, ‘धर्मवीर’ चित्रपट पाहिल्यानंतर संतोष जुवेकरची आई भावूक

प्राजक्ताने या वेबसीरिजचा टीझर शेअर करतेवेळी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती. यात ती म्हणाली, “प्रत्येक कलाकाराला आपल्या कारकिर्दीत विविधांगी भूमिकांमध्ये झळकण्याची, समाजात अस्तित्वात असणारी विविध पात्रं साकारण्याची, सतत काहीतरी नवं करण्याची इच्छा असते. मी त्याला अपवाद नाही. लहानपणापासून स्मिता पाटील, रंजना यांना बघत मोठी झाले, (मी त्यांच्याइतकी मोठी नक्कीच नाही.)”

“पण त्यांच्या कारकिर्दीतून प्रेरीत होऊन आणि तुम्हां मायबाप रसिक प्रेक्षकांवर विश्वास ठेवून केलेला हा प्रयत्न. माझ्यातल्या अभिनेत्रीवर विश्वास ठेवून माझ्या पदरी ही भूमिका टाकल्याबद्दल अभिजित पानसे व मराठीतील सगळ्यात मोठी वेबसीरीज बनवल्याबद्दल प्लॅनेट मराठी, अक्षय बर्दापूरकर यांचे आभार.”

बहुचर्चित ‘रानबाजार’ वेबसीरिजचा ट्रेलर ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला!

“१८ तारखेलाला trailer येतोय, २० ला series येतेय… #रानबाजार…. आतापर्यंत माझ्यावर व माझ्या कामांवर जसं प्रेम केलत, जो पाठींबा दिलात; तसाच या ही वेबसीरिजला द्याल अशी आशा व्यक्त करते. तुमचीच प्राजक्ता…”, असे प्राजक्ता माळी म्हणाली.

प्राजक्ता माळीने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत एक टीझर ही पोस्ट शेअर केली आहे. तिच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट केल्या आहे. तिची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत असून ती व्हायरल होत आहे.

अभिजित पानसे दिग्दर्शित पॉलिटिकल क्राईम थ्रिलर असलेल्या या भव्य वेबसिरीजची निर्मिती अक्षय बर्दापूरकर, प्लॅनेट मराठी, रावण फ्युचर प्रॉडक्शन्स आणि अभिजित पानसे,अनिता पालांडे यांनी केली आहे. येत्या २० मे रोजी ‘रानबाजार’ वेबसीरिज ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’वर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Story img Loader