मराठीमधील सतत चर्चेत असणारी अभिनेत्री म्हणजे प्राजक्त माळी. प्राजक्ता सोशल मीडियावर फारच चर्चेत असते. आता देखील तिने एक खास पोस्ट तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केली आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ शोमधून निवांत वेळ मिळाल्याने ती चक्क हिमाचल प्रदेशला पोहोचली आहे. याचदरम्यानचे तिने काही फोटो आणि व्हिडीओ तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्राजक्ता सध्या हिमाचल प्रदेशमध्ये एण्जॉय करत आहे. तिने काही फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना म्हटलं आहे की, “हास्यजत्रेला मिळालेल्या सुट्टीचा यथायोग्य वापर. काळजी नसावी, जत्रेत लवकरच परत येऊ. माझीही काळजी नसावी. मी काळजी घेतेय.” प्राजक्ता या ट्रिपसाठी फारच उत्सुक आहे. याचं कारण देखील तितकंच खास आहे. तिची ही पहिली सोलो ट्रीप आहे.

आणखी वाचा – VIDEO : “भगवान हूँ मैं”, ‘आश्रम ४’मध्ये नवा ट्विस्ट, उत्सुकता वाढवणारा टीझर प्रदर्शित

या ट्रीप दरम्यानचे काही व्हिडीओ तिने स्वतः शूट केले आहेत. पण तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की तिचे फोटो हे प्राजक्ताच्या वाहन चालकानेच काढले आहेत. तसं तिने तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. प्राजक्ताच्या या पोस्टला काही तासांमध्येच हजारो लाईक्स मिळाले आहेत. प्राजक्ताचे व्हिडीओ आणि फोटो पाहता तिचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.

आणखी वाचा – जबरदस्त प्रमोशन, देवदर्शन करुनही ‘सम्राट पृथ्वीराज’ला थंड प्रतिसाद, अक्षय कुमारच्या हाती निराशा

प्राजक्ता मराठी मालिकांमुळेच घराघरांत पोहोचली. आता तर तिने वेबविश्वात देखील पदार्पण केलं आहे. ‘रानबाजार’ या वेबसीरिजमध्ये तिने साकारलेल्या भूमिकेचं सर्वत्र कौतुक होत आहे. प्राजक्ताचा अभिनय अगदी बोलका आहे यात काहीच शंका नाही. पण ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये ती करत असलेलं सुत्रसंचालन देखील तितकंच उत्तम असतं.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actress prajakta mali enjoy her solo trip at himachal pradesh photos and video viral on social media kmd