मराठी सिनेसृष्टीमधील सतत चर्चेत असणारी अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी. प्राजक्ताने छोट्या पडद्यापासून आपल्या करिअरला सुरुवात केली आणि आज तिने कलाक्षेत्रात स्वतःचं एक वेगळंच स्थान निर्माण केलं आहे. सोशल मीडियावर तर ती फारच सक्रिय असते. वेगवेगळ्या लूकमधील प्राजक्ताचे फोटो पाहून नेटकरीही थक्क होतात. आता देखील प्राजक्ताने काळ्या रंगाच्या साडीमध्ये खास फोटोशूट केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा – राणादा-पाठकबाईंची लग्नापूर्वी लंडन ट्रिप, प्रेमात आकंठ बुडालेल्या सेलिब्रिटी कपलची चर्चा

प्राजक्ताचं हे नवं फोटोशूट फोटोशूट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. कारण प्राजक्ताचा यामध्ये नो ब्लाऊज लूक पाहायला मिळत आहे. काळ्या रंगाच्या साडीमध्ये तिचं सौंदर्य आणखीनच खुलून दिसत आहे. तसेच तिने ट्यूब ब्लाऊज परिधान केला आहे. प्राजक्ताने या साडीवर परिधान केलेले दागिने विशेष लक्षवेधी आहेत. तिच्या या नव्या लूकला चाहत्यांनी पसंती दर्शवली आहे.

प्राजक्ताच्या नव्या लूकमधील फोटोंना तासाभरामध्येच २० हजारापेक्षा अधिक लाईक मिळाले आहेत. तर नेटकऱ्यांनी कमेंटच्या माध्यमातून तिच्या सौंदर्याचं कौतुक केलं आहे. एका युजरने म्हटलं की, “काय ती अदा, काय ते रुप, काय ते सौंदर्य” तर दुसऱ्या युजरने म्हटलं की “प्राजक्ता अतिसुंदर”. “मेरे तो नेनौं में किरणों के पॉंखी” असं प्राजक्ताने हे फोटो शेअर करताना म्हटलं आहे.

आणखी वाचा – “माझ्या पतीसह आम्ही सगळेच नशेमध्ये होतो अन्…”; राधिका आपटेनेच सांगितलं स्वतःच्या लग्नात नेमकं काय घडलं?

प्राजक्ता फॅशनच्याबाबतीत नवनवीन प्रयोग करु पाहत आहे. यादरम्यान तिने ट्रोलर्सकडे देखील दुर्लक्ष करण्याचं ठरवलं आहे. प्राजक्ता ‘जुळून येती रेशीम गाठी’ या मराठी मालिकेमुळे प्रकाशझोतात आली. या मालिकेनंतर तिने मागे वळून पाहिलं नाही. सध्या ती ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कॉमेडी कार्यक्रमाचं सुत्रसंचालन करत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actress prajakta mali no blouse look and black saree photoshoot viral on social media fans says you are looking so beautiful kmd