मराठीमधील आघाडीची अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर फारच सक्रिय असते. प्राजक्ताला फिटनेसचं प्रचंड वेड आहे. व्यायाम करतानाचे काही व्हिडीओ देखील ती इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर करताना दिसते. आता देखील तिने असाच एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये चक्क एकाच वेळी १०८ सुर्यनमस्कार करताना ती दिसत आहे. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
आणखी वाचा – VIDEO : पाकिस्तानी रेस्तराँने काय केलं पाहा? आलियाच्या ‘गंगूबाई’चा व्हिडीओ शेअर करत पुरुषांसाठी ठेवली ऑफर
योगा आणि प्राणायम हा प्राजक्ताचा आवडीचा विषय आहे. व्यग्र वेळापत्रकामधून वेळ काढत ती याकडे विशेष लक्ष देते. तिच्या दिवसाची सुरुवातच व्यायामाने होते. प्राजक्ताच्या व्यायामामध्ये सुर्यनमस्कारचा देखील समावेश असतो. तिने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ते पाहायला मिळतं. सुर्यनमस्कार करत असताना प्राजक्ता कुठेही दमली नसल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत आहे.
सकाळी रम्य वातावरणामध्ये सुर्यनमस्कार आणि व्यायाम करण्याची मजा काही औरच. हा व्हिडीओ शेअर करत असताना प्राजक्ताने म्हटलं आहे की, “जागतिक योग दिनाच्यानिमित्ताने मी आज १०८ सुर्यनमस्कार केले. योग दिन हा २१ जूनला असतो. कदाचित या दिवशी मी पुन्हा सुर्यनमस्कार करेन. पण तुम्हीपण माझ्याबरोबर करणार असाल तर…काय म्हणता करणार का? तुम्हाला जमेल तितके करा.”
आणखी वाचा – Photos : सोनम कपूरच्या डोहाळे जेवणाचे फोटो पाहिलेत का?, लंडनमध्ये थाटामाटात पार पडला कार्यक्रम
२१ जूनला योग दिनाच्यानिमित्ताने माझ्याबरोबर सगळ्यांनी सुर्यनमस्कार करा असं प्राजक्ताने तिच्या चाहत्यांना सांगितलं आहे. योग आणि प्राणायम यामुळे तुमच्या दिवसाची सुरुवात उत्तम होते आणि तुम्ही निरोगी राहता हे प्राजक्ता नेहमी सांगते. प्राजक्ता स्वतः या सगळ्या गोष्टी फॉलो करते. योग आणि प्राणायमच तिच्या फिटनेसचं रहस्य आहे.