आपल्या अभिनयाने व सौंदर्याने चाहत्यांना भुरळ पाडणारी अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी. प्राजक्ता सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती सतत तिचे फोटो चाहत्यांसोबत शेअर करताना दिसते. तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर चर्चेचा देखील विषय ठरतात. पण आता प्राजक्ताने सोशल मीडियावर फोटो नाही तर स्वतःचेच काही मीम्स शेअर केले आहेत. हे मीम्स पाहून तुम्हालाही हसू अनावर होईल.
आणखी वाचा – कोणत्या दोन सख्ख्या भावांना डेट करत होत्या जान्हवी-सारा? करण जोहरचा मोठा खुलासा
प्राजक्ता माळीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हे मीम्स शेअर केले आहेत. पहिल्या मीम्समध्ये प्राजक्ताचे साडी लूकमधील दोन फोटो पाहायला मिळत आहेत. एका फोटोमध्ये साडीमधील तिचा ग्लॅमरस लूक दिसून येत आहे. त्या फोटोवर “पुण्यात असताना ती” असं लिहिलं आहे. तर दुसरा फोटो गृहिणीच्या लूकमधील आहे. या फोटोवर “गावाकडे आल्यावर ती” असं लिहिलेलं दिसत आहे.
‘रानबाजार’ वेबसीरिज, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामधील प्राजक्ताच्या सुत्रसंचालनावरूनही काही धम्माल मीम्स तयार करण्यात आले आहेत. प्राजक्ताने हे मीम्स शेअर करताना म्हटलं की, “खूप दिवसांनी मीम्सच्या दुनियेची सफर. मी एकटीच का? तुम्हीही आनंद घ्या…” प्राजक्ताची ही पोस्ट पाहून अनेकांनी मजेशीर कमेंट केल्या आहेत.
आणखी वाचा – रोहमन आणि ललित मोदी यांना एकत्रच डेट करत होती सुष्मिता? एक्स बॉयफ्रेंडशी ब्रेकअप झालं अन्…
एका युजरने “जाताना फरसाण घेऊन जा” असं म्हटलं आहे. तर काहींनी मीम्स आवडल्याचं म्हटलं आहे. ‘जुळून येती रेशीमगाठी’, ‘नकटीच्या लग्नाला यायचं हं’ यांसारख्या प्रसिद्ध मालिकांमधून प्राजक्ता प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. तिची ‘रानबाजार’ वेबसीरिज तर सुपरहिट ठरली. सध्या ती ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना दिसत आहे.